शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत उपाययोजना कराव्यात-  नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 07:07 PM2023-10-12T19:07:00+5:302023-10-12T19:10:56+5:30

राज्यातील अनेक अनुदानित शाळांतील मुलींच्या स्वछतागृहांची दयनीय अवस्था असल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले असून त्याची गंभीर दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे.

Measures should be taken to improve girls' dormitory in schools - Neelam Gorhe | शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत उपाययोजना कराव्यात-  नीलम गोऱ्हे

शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत उपाययोजना कराव्यात-  नीलम गोऱ्हे

मुंबई : सरकारी अनुदानित शाळेमध्ये मुलींच्या मासिक पाळीच्या वेळेची शारीरिक स्वच्छता राखण्यासाठी शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी स्वच्छ्ता गृहात पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारी शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात म्हटले आहे.

राज्यातील अनेक अनुदानित शाळांतील मुलींच्या स्वछतागृहांची दयनीय अवस्था असल्याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले असून त्याची गंभीर दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदन दिले आहे. यामध्ये अनेक स्वच्छतागृहे खुली अवस्थेत आहेत, मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स बदलण्यासाठी देखील जागा नसल्याने सरकारी शाळांमधील मुलींच्या स्वछतागृहांच्या सुधारणेबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे  डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सरकारी शाळेतील स्वच्छतागृहांची दुर्दशा झालेली असल्याने मुली शाळा सोडत आहेत. या बाबीचा परिणाम मुलीच्या कुटुंबाच्या मानसिकतेवर होवू शकतो. त्यामुळे सरकारी अनुदानित शाळामधील स्वच्छतागृह संदर्भात शासनस्तरावरून त्रुटी व सुविधा अभावाबाबत आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छतागृहाची अवस्था सुधारणेच्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना तत्पर करणेत यावी असेही त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: Measures should be taken to improve girls' dormitory in schools - Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.