शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
2
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
3
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
4
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
5
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
6
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
7
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
8
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
9
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
10
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
11
Suzlon Energy च्या शेअर्समध्ये घसरण, ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; नवं टार्गेट किती?
12
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
13
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
14
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
15
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
16
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
17
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
18
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
19
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
20
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?

मेट्रोला मिळणार केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Published: August 13, 2014 12:47 AM

उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला उद्या, बुधवारी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पीआयबी ची (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड) बैठक होत

पीआयबीची आज दिल्लीत बैठक : सुधारित प्रस्ताव ठेवणारनागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला उद्या, बुधवारी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पीआयबी ची (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड) बैठक होत असून तीत या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे २१ आॅगस्ट रोजी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. त्यानंतर शासनाच्या मंजुरीसह वाढीव खर्चासह १० हजार ५२६ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तातडीने केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. संबंधित आराखड्यावर उद्या, बुधवारी दिल्ली येथे आयोजित पीआयबीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांच्यासह नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. मेट्रोच्या आराखड्यास केंद्र सरकारच्या पीआयबीने मंजुरी दिली तर पुढील दोन दिवसात संबंधित प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार असल्यामुळे मंत्रिमंडळातही या प्रकल्पाला त्वरित मंजुरी मिळेल. (प्रतिनिधी)