मिनीबस उलटून १ ठार, १२ जखमी

By Admin | Published: March 28, 2017 03:50 PM2017-03-28T15:50:04+5:302017-03-28T15:50:04+5:30

लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ घडली़

Minibus recovered 1 dead, 12 injured | मिनीबस उलटून १ ठार, १२ जखमी

मिनीबस उलटून १ ठार, १२ जखमी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
उदगीर / हेर (जि. लातूर), दि. 28 : लातूरहून उदगीरकडे निघालेली भरधाव मिनीबस उलटून १ ठार तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ घडली़ 
एमएच १२ सीएच ४९७४ क्रमांकाची मिनीबस लातूरहून प्रवासी घेऊन उदगीरकडे निघाली होती़ दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही भरधाव मिनीबस करडखेल पाटीजवळ आली असता चालकाचा ताबा सुटून रस्त्याशेजारी उलटली़ या घटनेत कादरी बदरुद्दीन शफाउल्ला कादरी (५२ रा़उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला़ तर श्वेता सोमनाथ कांबळे (५), सुषमा सोमनाथ कांबळे (४), कुमार सोमनाथ कांबळे (७), हेमलता सोमनाथ कांबळे (२०), आरुष सोमनाथ कांबळे (२), बालिका चंद्रकांत बरगे (३०, सर्व रा़ शिरुर अनंतपाळ), शिवाजी मारोती शेल्हाळे (३८, थेरगाव), सुवर्णा विठ्ठल जावीर (३०, बरकतनगर, लातूर), जनाबाई संतोष आडे (३०, महाराणाप्रताप तांडा, लातूर), सूर्यकांत तातेराव कांबळे (५०, रा़येरोळ) व नागरबाई गंगाधर गायकवाड (६०, रा़डिग्रस) हे १२ प्रवासी जखमी झाले आहेत़ त्यांना उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपारासाठी दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, श्वेता, सुषमा व कुमार कांबळे या बालकांना या घटनेत अधिक मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ याप्रकरणी मिनीबस चालकावर उदगीर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

आॅटो चालकाचे प्रसंगावधाऩ़़

मिनीबस उलटल्याची माहिती मिळताच करडखेल पाटीवरील पोलीस कर्मचारी मोहन सूर्यवंशी तसेच युवक गजानन बिरादार, गजानन पांचाळ तसेच आॅटो चालक राजू कसबे व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यांनी जखमींना बसबाहेर काढले़ आॅटो चालक कसबे यांने क्षणाचाही विलंब न लावता जखमींना आपल्या आॅटोतून उदगीरला उपचारासाठी हलविले़

Web Title: Minibus recovered 1 dead, 12 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.