अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

By admin | Published: January 4, 2015 11:05 PM2015-01-04T23:05:06+5:302015-01-04T23:05:06+5:30

लोकमान्यनगर, पाडा क्र. ४, चैतीनगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली तीन महिने लैंगिक अत्याचार करणा-या विक्रांत कराडकर (२०) आणि रोशन म्हात्रे (२८) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक

Minor girl child abuse | अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार

Next

ठाणे : लोकमान्यनगर, पाडा क्र. ४, चैतीनगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेली तीन महिने लैंगिक अत्याचार करणा-या विक्रांत कराडकर (२०) आणि रोशन म्हात्रे (२८) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. या अत्याचाराची कुठेही वाच्यता न करण्यासाठी त्यांनी तिच्याकडून ३० हजारांची रोकडही उकळली. आणखी पैसे काढण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार उघड झाला.
चैतीनगर येथील रहिवासी असलेल्या विक्रांतने आधी या तरुणीशी सलगी वाढविली. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्याशी ‘जवळीक’ साधली. कालांतराने मात्र लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करू लागला. दरम्यान, यात त्याचा मानलेला मामा रोशन यानेही तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार १९ सप्टेंबर ते २८ डिसेंबर २०१४ या चार महिन्यांच्या कालावधीत सुरू होता. रोशन हा मनसेचा कार्यकर्ता असून विक्रांतचा डीजेचा व्यवसाय आहे. त्याच्याच डीजेच्या गोदामात रात्रीच्या वेळी ते धमकावून नेत आणि तिच्याशी आळीपाळीने हा प्रकार करीत होते. याची कुठेही वाच्यता करायची नसेल आणि बदनामीपासून वाचायचे असेल तर ‘५० हजारांची खंडणी द्यावी लागेल’, अशी धमकी या दोघांनी तिला दिली होती. शिवाय, पैसे दिले नाही तर ‘तुझ्या बहिणीचीही अशीच अवस्था करू’ अशी धमकीही त्यांनी दिली. त्यामुळे तिने त्यांना आईच्या हिंदुस्थान को-आॅप. या बँकेच्या लोकमान्यनगर शाखेच्या खात्यातून तीन वेळा १० हजार अशी ३० हजारांची रोकड काढून दिली. शेवटचे १० हजार काढल्यानंतर बँकेला संशय आला. विक्रांतने पुन्हा तिच्याकडून एक लाख ६० हजारांच्या धनादेशावर जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली आणि हे पैसे काढण्याच्या प्रयत्नात असतानाच बँकेने तिच्या आईला पाचारण केले. तेव्हा दोघांकडून तिच्यावर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार करून बदनामी न करण्यासाठी ३० हजार उकळल्याचे आणि पुन्हा बहिणीचीही अब्रू शाबूत ठेवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Minor girl child abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.