बेपत्ता विमान भारताजवळ कोसळले?
By admin | Published: June 5, 2014 12:24 AM2014-06-05T00:24:25+5:302014-06-05T00:24:25+5:30
मलेशियाचे एम एच 37क् हे 239 प्रवाशांसह बेपत्ता झालेले विमान भारताजवळ कोसळले असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.
Next
>सिडने : मलेशियाचे एम एच 37क् हे 239 प्रवाशांसह बेपत्ता झालेले विमान भारताजवळ कोसळले असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. हे विमान कोसळल्यानंतर काही दिवसांत भारताच्या दक्षिण किना:याजवळून कमी तीव्रतेचे काही संदेश ऐकू आल्याचे संशोधक म्हणत आहेत, तर कोची ते फुकेट हा प्रवास समुद्रमार्गे करणा:या एका ब्रिटिश महिलेने हे विमान जळताना पाहिल्याचा दावा केला आहे.
8 मार्च रोजी हे विमान जेव्हा 239 प्रवाशांसह बेपत्ता झाले, तेव्हा समुद्राखाली नोंदणी करणा:या उपकरणांनी दोन गूढ आवाजांची नोंद केली आहे. संशोधकांनी आज या आवाजांची नोंद प्रसिद्ध केली. बेपत्ता विमान पाण्यात बुडत असतानाचे हे अखेरचे आवाज असावेत असा अंदाज बांधला जात आहे. हा आवाज अगदी मंद आहे. भारताचे दक्षिण टोक ते ऑस्ट्रेलियाच्या वायव्येकडील 3क्क्क् मैलांचे अंतर यामध्ये या आवाजाची जागा आहे; पण हे विमान इंधन संपल्यामुळे कोसळले असेल तर ते हिंदी महासागराच्या आगAेय भागार्पयत पोहोचू शकत नाही. (वृत्तसंस्था)
ब्रिटिश महिलेचा दावा
4केरळच्या कोची बंदरापासून पतीसह फुकेटर्पयत हिंदी महासागरातून प्रवास करणा:या एका ब्रिटिश महिलेने आपण विमान जळताना पाहिले होते असा दावा केला आहे. कॅथरिन टी (41) असे या महिलेचे नाव असून, तिने रविवारी संशोधक पथकाला ही माहिती दिली आहे. रात्री आपल्या 4क् फुटी बोटीचे संरक्षण करत असताना, तिला हे विमान जळताना दिसले होते. त्यानंतर या दाम्पत्याने आपण कोसळलेल्या विमानाजवळ असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
4टी समुद्रात 13 महिने होती. विमानाची चौकशी सुरू होती, तेव्हा आपण ही बाब सांगितली नाही, कारण आपले म्हणणो चुकीचे ठरविले जाईल, अशी भीती वाटत होती असे तिने म्हटले आहे. मी विमानासारखे काहीतरी जळताना पाहिले. नंतर मला वाटले, मला वेड लागले आहे. जळणा:या विमानाचे दिवे केशरी रंगाचे होते. विमानाचे असे दिवे मी कधीच पाहिले नव्हते, असे तिने फुकेट गॅङोट या वृत्तपत्रला सांगितले आहे. संशोधक टी च्या दाव्यातील सत्यता पडताळून पाहणार आहेत.