आमदार बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:20 PM2017-07-24T16:20:40+5:302017-07-24T16:20:40+5:30

आमदार बच्चू कडू यांनी शाब्दिक वादानंतर नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर हात...

MLA Bachu Kadu hoisted the hands of the Municipal Commissioner of Nashik | आमदार बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

आमदार बच्चू कडू यांनी उगारला नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात

Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - आमदार बच्चू कडू यांनी शाब्दिक वादानंतर नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर हात उगारल्याचं वृत्त आहे. बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्यावर हात उगारला. 
 
नाशिक महापालिकेने १९९५चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्यावर हात उगारला. शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखले अन्यथा अनर्थ झाला असता. 
 
शरणपुररोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
 
याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.

Web Title: MLA Bachu Kadu hoisted the hands of the Municipal Commissioner of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.