बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 03:44 PM2019-12-21T15:44:51+5:302019-12-22T09:32:33+5:30

पैठण तालुक्यातील सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालिन तहसिलदार तथा महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने सुमारे 15 हजार बोगस रेशन कार्ड वाटप केले होते.

MLA Bhumre raised questions in the Assembly | बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

googlenewsNext

मुंबई: सन 2000 ते 2015 च्या काळात पैठणचे तत्कालीन तहसीलदार यांनी सेतू चालकाच्या मदतीने जवळपास 15 हजार बोगस शिधाप्रतिका वाटप केले असून या शिधाप्रतिकाआधारे विविध शासकीय योजनाचा लाभ उचलला जात असल्याचे आरोप करत, दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळ अधिवेशनात पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भूमरेंनी शनिवारी लक्षवेधी सूचना मांडली.

पैठण तालुक्यातील सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालिन तहसिलदार तथा महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने सुमारे 15 हजार बोगस रेशन कार्ड वाटप केले होते. तर त्यांनी वाटप केलेल्या शिधापत्रिकेच्या आधारे बोगस शिधाप्रतिधारकांकडून विविध योजनाचा लाब घेण्यात येत आहे.

तसेच याच बोगस शिधाप्रतिकाच्या आधारे लाभार्थ्यासाठी शासनाकडून आलेल्या अन्नधान्याचा साठा काळया बाजारात विकण्यात येत आहे. तर याच लोकांनी संपूर्ण योजना कागदोपत्री दाखवून यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टचार केलेला आहे. शिधापत्रिका अर्ज स्विकारण्यापासून ते शिधापत्रिका वाटपानंतरच्या नोंदी व सक्तीच्या अटी शर्तीचे सुद्धा यात उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच दि.31.3.2013 ते 31.8.2013 या कालावधीत 21394 शिधापत्रिकेपैकी फक्त 2518 एवढयाच शिधापत्रिकेच्या नोंदी ठेवण्यात आल्याचा आरोप सुद्धा आमदार भुमरे यांनी केला आहे.

तर यासर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्य समिती नेमण्यात आली, परंतु या समितीने त्यांच्या सोयीनुसार अहवाल सादर करून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सुद्धा अजूनही कोणतेही कारवाई दोषींवर करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाने यासर्व प्रकरणाची चौकशी करून महा ई सेववा केंद्र चालक भाऊसाहेब काळे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती यावेळी आमदार भुमरेंनी केली.

पैठण तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस शिधाप्रतिका तयार करून वाटप केली आहेत. यात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून दोषींवर मात्र कोणतेही कारवाई झाली नाही. त्यामुळे काळे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. - संदीपान भुमरे ( शिवसेना आमदार, पैठण )

Web Title: MLA Bhumre raised questions in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.