कोरोना लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या रकमेचे वीजबिल दिल्याच्या निषेधार्ह शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करत कार्यालय अधिकाऱ्याच्या केबिनची तोडफोड केली होती. या तोडफोडीविरोधात तीन मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बारा दिवसानंतर त्यांची सुटका झाल्यावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकाला फोन करुन विचारपूस केली.
तुकाराम मुंढेंच्या संघर्षाला सलाम... कुटुंब सांभाळण्यासाठी केली शेती; IAS होऊन भावाची 'स्वप्नपूर्ती'
काय झाला संवाद?
राज ठाकरे : जय महाराष्ट्रसुशांत कुटे : जय महाराष्ट्र, ते आंदोलन झालं, रविवारी सुटलो आम्हीराज ठाकरे : बरं, चला अभिनंदन तुम्हा सगळ्यांचंसुशांत कुटे : नांदगावकर साहेबांनी खूप मदत केली, घरच्यांना फोन वगैरे केला, सगळ्यांशी बोललेराज ठाकरे : हो न?सुशांत कुटे : हो, आणि तुमचंही लक्ष होतं, त्यांनी सांगितलं.. गणपतीमुळे काय भेट नाही झालंराज ठाकरे : काय त्रास नाही न झाला?सुशांत कुटे : नाही साहेब, त्रास नाही झाला, बारा दिवस लागले तिथे फक्तराज ठाकरे : हा ते ठीक आहे, आत्मचरित्राची पानं वाढलीसुशांत कुटे : हाहाहाहा, तुमचा आशीर्वाद आहे साहेब. बाकी कायराज ठाकरे : चला शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनासुशांत कुटे : गणपती झाल्यावर भेटायला येतोराज ठाकरे : हो या..
शिरूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आधीच नागरिक अडचणी आले असताना मोठ्या रक्कमेचे वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात महावितरणे वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली. परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच यावेळी कार्यालयाबाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आले होते. परंतु अधिकारी नसल्याने त्यांची गैरसोय झाली. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी थेट कार्यालयाची तोडफोड केली होती. यानंतर संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वाढीव बिलं पाठवून चांगलाच 'शॉक' दिला आहे. कामधंदा बंद असल्यामुळे आधीच चिंतेत असलेला सर्वसामान्य ग्राहक यामुळे अधिकच चिंतातूर झाला आहे. मार्च ते मे 2020 या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी फुगलेली वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यासंदर्भात राज्यभरात आंदोलनंही झाली. शिवाय हा मुद्दा हायकोर्टातही गेला. परंतु उच्च न्यायालयानेही कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.
राज्याला महसुलाची अडचण आहे, पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच या विषयात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून वीजबिलात तात्काळ सूट द्यावी. तसंच भविष्यात ही सूट कोणत्याही प्रकाराने वसूल करायचा प्रयत्न करु नये. याशिवाय सरकारी आणि खाजगी वीज कंपन्यांनाही कडक शब्दांत समज द्यावा, अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल,असा इशारा राज ठाकरे यांनी सरकारसह विजकंपन्यांना दिला होता.
अन्य महत्वाच्या बातम्या-
मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा
आदित्य टी कोण हे रियाला माहीत नाही, पण त्यांची इन्स्टा पोस्ट तिने लाईक केलीय; नितेश राणेंचा बाण