“लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 12:37 PM2024-04-06T12:37:46+5:302024-04-06T12:38:06+5:30

MNS Prakash Mahajan News: काँग्रेस मोडकळीस आलेले घर आहे. बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभे राहायला कुणी तयार नाही, अशी मनसे नेत्यांनी केली आहे.

mns leader prakash mahajan said this lok sabha election 2024 complicated raj thackeray must be thinking | “लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल”

“लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल”

MNS Prakash Mahajan News: आम्ही शांत नाही. लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे हे पाडव्याच्या सभेत निर्णय जाहीर करतील. पक्षाने निर्देश दिले आहेत की याबाबत फक्त राज ठाकरे निर्देश देतील. आम्ही सगळीकडे फिरतो, ही निवडणूक मोठी किचकट आणि गुंतागुंतीची आहे. राज ठाकरे याबाबत चिंतन करत असतील. राज ठाकरे जेव्हा शांत असतात तेव्हा जास्त चिंतन करत असतात, असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना प्रकाश महाजन यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी आणि एकंदरीत घडामोडींबाबत भाष्य केले. तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेस हे मोडकळीस आलेले घर आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्यासाठी गर्दी होत आहे. काँग्रेसचे दार चिंचोळे आहे त्यामुळे तिकडे बाहेर पडताना चेंगराचेंगरी सुरू आहे. दारुण पराभव होऊ नये यासाठी उभे राहायला कुणी तयार नाही, असा टोला प्रकाश महाजन यांनी लगावला.

राज ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता आहे

०९ तारखेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतील, याची उत्सुकता आहे. अमित शाह आणि राज ठाकरे यांची झालेली भेट ही उच्च पातळीवरची आहे. याबाबत आम्हाला काही कळवले नाही, पण काहीतरी सकारात्मक चर्चा झाली असेल, ती योग्य वेळी बाहेर येईल. तसेच जनतेत संभ्रम अजिबात नाही, असे प्रकाश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच येत्या ९ एप्रिलला शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. कारण, मनसेच्या ट्विटर हँडलवरून गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये ‘नक्की काय घडलंय, काय घडतंय’ हे प्रत्यक्ष राज ठाकरे सांगणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सभेत मोठे खुलासे राज ठाकरे करणार असल्याचे टिझरवरून दिसत आहे.

 

Web Title: mns leader prakash mahajan said this lok sabha election 2024 complicated raj thackeray must be thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.