मुंबई, दि. 1 - स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळात आज राज ठाकरेंची मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते.
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका, शिवसेना आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं. स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं ते म्हणाले.
महानगरपालिकेतील टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली, पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं, असं राज म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांवर निशाणा साधला. बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले. लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी राज यांची मुलाखत घेतली. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
मुलाखतीतील मुद्दे -
महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे
माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे
अमितची प्रकृती उत्तम आहे , बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत : राज ठाकरे.
महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे
मुंबई: इतर पक्ष संपवण्याचं पंतप्रधान मोदींचं राजकारण - राज ठाकरे.
मुंबई: पदाधिका-यांच्या कामाचा आढावा घेतोय - राज ठाकरे.
मुंबई: संघटना बांधणीमध्ये मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे
मुंबई: टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे.