शिक्षकाच्या हत्येत दोनपेक्षा जास्त आरोपी, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 11:16 PM2017-12-05T23:16:34+5:302017-12-05T23:17:04+5:30

More than two accused in the murder of teacher, relatives expressed their doubts | शिक्षकाच्या हत्येत दोनपेक्षा जास्त आरोपी, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

शिक्षकाच्या हत्येत दोनपेक्षा जास्त आरोपी, नातेवाईकांनी व्यक्त केला संशय

Next

 सावंतवाडी - गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. गुरव यांना भडगाव येथून कावळेसादला एकट्याने आणणे शक्य नाही. आरोपीला कोणीतरी मदत केली असावी तसेच गुन्ह्यात दोन कारचा वापर केला असावा, असा अंदाजही गुरव यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
शिक्षक गुरव यांच्या भडगाव येथील नातेवाईक व ग्रामस्थांनी मंगळवारी सावंतवाडीत येऊन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची भेट घेतली. हा तपास गडहिंग्लज पोलिसांकडे वर्ग केला जाऊ नये. तसेच तिसºया आरोपीबाबत माहिती घेण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार खमलेट्टी, बसवराज मुत्नाळे, राजशेखर कित्तूरकर, बसवराज हिरेमठ, शशिकांत चोथे, गजानन गुरव, मलगोंडा पाटील, सुनील गुरव, शंकर गुरव, शामराव गुरव, चंद्रशेखर गुरव, मुकुंद गुरव, शिवानंद मठपती, पोलीस पाटील उदय पुजारी आदी उपस्थित होते.
यावेळी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक धनावडे यांचे तपासाबाबत आभार मानले. ‘तुम्हीच माझे भाऊ’ असे म्हणत तपास तुम्हीच करा, गडहिंग्लज पोलिसांना देऊ नका, अशी विनंती केली. रक्ताच्या एका थेंंबावरून माझ्या भावाचा मृतदेह शोधून दिला, याबद्दल त्यांनी धन्यवाद मानले. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घ्या. कारण हत्येनंतर मृतदेह एकटा माणूस घरातून आंबोली कावळेसादपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्याला कोणीतरी मदत केली असावी. त्याचा शोध घ्या. तसेच या घटनेत दोन कार वापरल्या असाव्यात, असा संशयही नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
आरोपी पत्नी जयलक्ष्मी घरातून बेपत्ता होताना ती मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन गेली आहे. हे दागिने शोधून काढा आणि कोणत्यातरी अनाथालयाला दान द्या, असेही शिक्षक गुरव यांची बहीण सरला गुरव यांनी पोलिसांना सांगितले. तर भडगावचे पोलीस पाटील उदय पुजारी यांनीही या गुन्ह्यात आणखी कोणाचातरी सहभाग आहे. एकटा सुरेश चोथे हे करूच शकत नाही. तसेच ज्या कारमधून मृतदेह घेऊन गेले ती कार नादुरूस्त होती. तरीही त्या कारमधून मृतदेह कसा काय घेऊन जाऊ शकतो? आणखी कोणत्यातरी वाहनाचा यात समावेश आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.           
आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आरोपी सुरेश चोथे व जयलक्ष्मी गुरव यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही गेल्या आठवड्याभरात काय तपास केला याची माहिती न्यायालयाला दिली आहे.
 
बेपत्तानंतर गुरव यांच्या शोधासाठी आरोपी पुढे
शिक्षक गुरव हे घरातून बेपत्ता झाल्यानंतर गावात शोधाशोध सुरू झाली, तसा मी त्यातला नाही असे म्हणत आरोपी सुरेश चोथे हा सगळ््यात पुढे होता. तो गावकºयांना मार्गदर्शन करीत होता. कोल्हापूरला गेले असतील, विहिरीत बघूया, डोंगरात जाऊया असे सांगून ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची सतत दिशाभूल करीत होता.
 
दागिने चोरीचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी करावा

शिक्षक गुरव यांच्या हत्येचा गुन्हा सावंतवाडीत नोंद आहे. त्याचा तपास फक्त सावंतवाडी पोलीस करणार आहेत. मात्र दागिने चोरीचा गुन्हा गडहिंग्लज पोलिसांकडे आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास गडहिंग्लज पोलिसांनी करावा. त्यात आमचा कोणताही सहभाग असणार नाही, असे मत पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी बार असोसिएशनला आवाहन
शिक्षक गुरव यांच्या कुटुंंबीयांनी तसेच नातेवाईकांनी मंगळवारी सावंतवाडीत येऊन बार असोसिएशनला निवेदन सादर केले. यात आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, अशी विनंती बार असोसिएशनला केली आहे. यावर बार असोसिएशनही सकारात्मक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: More than two accused in the murder of teacher, relatives expressed their doubts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.