मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ समाजसेवक, विचारवंत कॉ. गोविंद पानसरे या दोघांची मॉर्निंग वॉकला गेले असतानाच हत्या करण्यात आली. दोघांचेही मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी तसेच विचारवंतांना मारून विचार संपत नाही, हा संदेश देण्यासाठी राज्यभरात सध्या ‘मॉर्निंग वॉक’ चळवळीने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, औरंगबाद, नागपूर या शहरात सामाजिक कार्यकर्ते मॉर्निंग वॉक करून या प्रवृत्तीचा सध्या निषेध करीत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चळवळ राज्यभर फोफावत असल्याची माहिती या चळवळीतील कार्यकर्ते शरद कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘मॉर्निंग वॉक’ चळवळ जोरात
By admin | Published: March 02, 2015 2:35 AM