तळेगावात हलते, जिवंत देखावे
By admin | Published: September 10, 2016 01:38 AM2016-09-10T01:38:38+5:302016-09-10T01:38:38+5:30
शहरातील गाव विभागातील मंडळांनी जिवंत व हलत्या देखाव्यांवर भर दिला असून समाजप्रबोधन केले आहे.
तळेगाव दाभाडे : शहरातील गाव विभागातील मंडळांनी जिवंत व हलत्या देखाव्यांवर भर दिला असून समाजप्रबोधन केले आहे.
गणपती चौकातील श्री गणेश तरुण मंडळ हा मानाचा पाचवा गणपती असून, श्रीकांत मेढी अध्यक्ष आहेत. कडोलकर कॉलनी येथील श्री शिवाजी मित्र मंडळाने फुलांची आरास केली आहे. रोहित प्रसाद अध्यक्ष आहेत. कालिका गणेशोत्सव तरुण मंडळाने आकर्षक सजावट केली आहे. माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर अध्यक्ष आहेत.
खळदे आळीतील मुरलीधर मंडळाचे अध्यक्ष योगेश चौधरी आहेत. भगवान श्रीकृष्णाचे विराट दर्शन हा हलता देखावा उभारला आहे. भेगडे तालीम मंडळाचा मानाचा शेवटचा गणपती आहे. विशाल सुदाम भेगडे मंडळाचे अध्यक्ष आहेत. राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा मानाचा चौथा गणपती आहे. अक्षय जगदाळे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मानाचा तिसरा गणपती आहे. संदीप पिंगळे अध्यक्ष आहेत. घोरावडी स्टेशन येथील तरुण ऐक्य मित्र मंडळाचे धनराज माने अध्यक्ष आहेत. गणपतीची भव्य मूर्ती आकर्षणाचा विषय ठरली आहे. ज्येष्ठ नेते बबन भेगडे मंडळाचे संस्थापक आहेत. संतोष छबूराव भेगडे आधारस्तंभ आहेत. कडोलकर कॉलनी येथील स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन खळदे आहेत.
दाभाडेआळी येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळाने शिवाजी महाराजांची आगऱ्याहून सुटका हा जिवंत देखावा सादर केला आहे. विशाल साहेबराव दाभाडे मंडळाचे अध्यक्ष आहेत.
जिजामाता चौक येथील जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश चौधरी आहेत. पाच मूर्तींच्या साहाय्याने व्यसनमुक्तीवर आधारित हलता देखावा सादर केला आहे.
अमर खडकेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण ढेंबे असून, शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारली आहे. आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश परदेशी आहेत. तीन मूर्तींच्या साहाय्याने गंगावतार हा देखावा सादर केला आहे. भेगडे आळी येथील श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विनायक भेगडे आहेत. मंडळाने या वर्षी लेझर शो द्वारे ‘ झाडे वाचवा झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला आहे. अरुण भेगडे पाटील मंडळाचे संस्थापक आहेत. भेगडे आळी येथील कान्होबा मित्र मंडळाचे सागर टकले अध्यक्ष आहेत. मंडळाने आकर्षक रोषणाई केली आहे.
विशाल मित्र मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील पाटील आहेत. मंडळाने ‘भवानी मातेची तलवार’ हा आकर्षक हलता देखावा सादर केला आहे. हिंदूराज तरुण मंडळाने कान्होजी जेधेंची स्वराज्यनिष्ठा हा देखावा सादर केला आहे. अध्यक्ष मनीष खळदे आहेत. राष्ट्रतेज तरुण मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टकले असून मंडळाने ‘मोडेन पण वाकणार नाही ’ संभाजीमहारांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर केला. संकल्पना सुभाष शिरसाट यांची आहे. (वार्ताहर)
>शहरातील मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री डोळसनाथ तालीम मंडळाची रिद्वी-सिद्वीसमवेत असलेली भव्य गणेशमूर्ती आकर्षण आहे. मंडळाची स्थापना १९०३ मध्ये झाली आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे. फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
राजेंद्र चौकातील जय बजरंग तरुण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पंकजा गुंदेशा आहेत. मंडप आवार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.तळेगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. मखरातील सुबक मूर्तीला रोषणाई करण्यात आली आहे.