MPSC : ना. तहसीलदारपदी निवड झालेल्या तरुणावर आली शेतमजूर म्हणून राबण्याची वेळ; म्हणाला, लोक आम्हाला हसतात आणि सरकारला...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:42 PM2021-03-12T12:42:46+5:302021-03-12T12:43:24+5:30
MPSC : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने (Pravin Kotkar) केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे.
मुंबई - एमपीएससीच्या (MPSC Exam) परीक्षांवरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. काल परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात परीक्षार्थींचा उद्रेक झाल्यानंतर आज परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (MPSC Exam Date) या गदारोळादरम्यान, एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. (Despite being elected as Tehsildar, he is not getting appointment, so young man work as an agricultural laborer)
प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने एमपीएससीमधून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र निवड होऊन दहा महिने झाले तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या तरुणावर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.
ट्विटरवरून व्यथा मांडताना प्रवीण कोटकर म्हणाला की, MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र १० महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिलेी नाही. त्यामुळे सध्या मी शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी मिळणार? असा सवाल त्याने विचारला आहे.
MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली.10 महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिली नाही. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय.लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी ?
— Pravin Kotkar (@pravinrkotkar) March 11, 2021
#MPSC_2019_Joining@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@OfficeofUT@waglenikhil
दरम्यान, 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या म्हणजे शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.