चंद्रभागेच्या वाळवंटात मैला वाढला !
By admin | Published: April 4, 2015 04:16 AM2015-04-04T04:16:50+5:302015-04-04T04:16:50+5:30
वाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार राहुट्यांना बंदी घातली खरी मात्र ते जणू शौचासाठीच मोकळे केल्याचे चित्र सध्या वाळवंटातील घाटाजवळ
दीपक होमकर, पंढरपूर
वाळवंटाचे प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार राहुट्यांना बंदी घातली खरी मात्र ते जणू शौचासाठीच मोकळे केल्याचे चित्र सध्या वाळवंटातील घाटाजवळ गेल्यावर दिसते. त्यामुळे राहुट्या हटविल्याने कचरा कमी झाला तरी मैला वाढल्याने वाळवंटातील प्रदूषण रोखण्याचा न्यायालयाचा उद्देश अद्याप तरी सफल झाला नसल्याचे दिसते.
उच्च न्यायालाच्या निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी केल्याने प्रशासनाचे कौतुक होत असले तरी त्याचा मूळ उद्देशच सफल झालेला नाही. उलट तुलनेने कार्तिकी एकादशीला राहुट्या असतानाही वाळवंटात शौचाला बसण्यास प्रतिबंध घालण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त केल्यामुळे वाळवंटात कमी मैला होता. चैत्रवारीत वाळवंटात राहुट्या आणि हॉटेल उभारण्यास प्रशासनाने मनाई केल्याने वाळवंट पूर्ण मोकळे होते. शौचाला बसण्यासही बंदी असल्याने प्रशासनानेही तेथे तात्पुरते शौचालय उभे केले नव्हते. त्यामुळे अनेकांनी मोकळ््या मैदानातच घाण केली. त्यामुळे वारी संपल्यावर वाळवंटामध्ये दुर्गंधी पसरली आहे.