नागपूर - चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या अधिका-यावर गुन्हा दाखल

By admin | Published: August 30, 2016 02:08 PM2016-08-30T14:08:45+5:302016-08-30T14:08:45+5:30

चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकऱणी गिट्टीखदान पोलिसांनी महापालिकेच्या अनामिक अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Nagpur - In the case of death of Chimudra, a case has been registered against the municipal corporation officer | नागपूर - चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या अधिका-यावर गुन्हा दाखल

नागपूर - चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी महापालिकेच्या अधिका-यावर गुन्हा दाखल

Next
>- ऑनलाइन लोकमत
चिमुकल्याचा मृत्यू : प्रशासनाची लपवाछपवी : दोषींना पाठीशी घालण्याचे प्रयत्न 
नागपूर, दि. 30 - चिमुकल्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांची नावे उघड करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्याने गिट्टीखदान पोलिसांनी महापालिकेच्या अनामिक अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महापलिका प्रशासनाने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरूच ठेवल्यास पुढच्या काही दिवसात गंभीर दखल घेण्याची तयारी पोलीस प्रशासनाने चालवली आहे. 
 
प्रकरण पाच महिन्यांपूर्वीचे आहे. गिट्टीखदानमधील मानवसेवानगरात (पशू वैद्यकीय महाविद्यालय) राहणारा गुरफान अली अकबर अली (वय ८ वर्षे) हा बालक १५ मार्चला सायकल चालवित होता. रस्त्याच्या मध्ये असलेल्या आणि झाकण नसलेल्या गटारात (सेफ्टी टँक) पडून गुरफानचा करुण अंत झाला. या घटनेने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या हलगर्जीपणाचा निषेध नोंदवत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी रेटली होती. जनभावना तीव्र झाल्याचे पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ज्या गटाराने गुरफानचा बळी घेतला त्याची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, ते तपासले असता महापालिका प्रशासनाचे अधिकारी त्याला जबाबदार असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले. 
 
महापालिकेची टाळाटाळ 
पोलिसांनी त्या गटारावर झाकण बसविण्याची तसेच सुरक्षेच्या अन्य उपाययोजना करण्याची जबाबदारी कोणत्या अधिका-याची आहे, ते विचारण्यासाठी महापालिका आयुक्तांसह विविध विभागाच्या अधिका-यांशी पत्रव्यवहार केला. प्रत्यक्षही चौकशी केली. मात्र, महापलिका प्रशासनाने पोलिसांना दाद दिली नाही. दोषींना पाठीशी घालण्यासाठी संबंधित अधिका-यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी संबंधित अधिकारी, कर्मचा-याविरुद्ध गुरफानच्या मृत्यूला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला. 
 

Web Title: Nagpur - In the case of death of Chimudra, a case has been registered against the municipal corporation officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.