नामविस्ताराचे श्रेय सर्वाचे

By admin | Published: July 9, 2014 12:02 AM2014-07-09T00:02:01+5:302014-07-09T00:02:01+5:30

नामविस्तारासाठी प्रयत्न करणा:या सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणो काम करणा:या व्यक्तींचे आहे.

The name extends the credit to everyone | नामविस्ताराचे श्रेय सर्वाचे

नामविस्ताराचे श्रेय सर्वाचे

Next
पुणो : राज्य शासनाने पुणो विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला, याचे श्रेय माङो एकटय़ाचे नाही, तर नामविस्तारासाठी प्रयत्न करणा:या सर्व सामाजिक संघटना, राजकीय  पक्ष आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणो काम करणा:या व्यक्तींचे आहे. थोडासा विलंब झाला असला, तरी आता शेवट गोड झाल्याने सर्वाना आनंद झाला आहे. त्यामुळे मला कोणत्याही वादात पडायचे नाही. परंतु, विद्यापीठाने यापुढे जगभरातील महिलांसाठी प्रेरणादायी काम करावे, अशी अपेक्षा  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केली.
विविध राजकीय पक्षांच्या व संघटनांच्या कार्यकत्र्यानी पुणो विद्यापीठ परिसरात नामविस्ताराबद्दल जल्लोष साजरा केला. विद्यापीठ आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस भुजबळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आमदार जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजीव सोनवणो,  डॉ. दत्तात्रय बाळसराफ आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या अधिसभेने नामविस्ताराचा ठराव एकमताने राज्य शासनाकडे पाठविला होता. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा ठराव शासनाकडे पडून होता.  निर्णय लवकर व्हावा, अशा भावना सर्व संघटनांकडून व्यक्त केल्या जात होत्या. समता परिषदेच्या बैठकीतही यावरील लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.  त्यामुळे गेल्या आठवडय़ात मंत्री मंडळाच्या बैठकीत नामविस्ताराच्या प्रस्तावावर चर्चा व्हावी, अशी मागणी मी केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले, हे सर्वाना माहीत आहे. आता त्यावर मला काहीही बोलायचे नाही. परंतु, नामविस्ताराची मागणी योग्य असल्याने सोमवारी मंत्रिमंडळाने विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा एकमुखाने निर्णय घेतला.  यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांचे आभार मानण्यासाठी आज मी विद्यापीठात आलो आहे.’’ (प्रतिनिधी)
 
शेवट गोड झाला : भुजबळ
नामविस्ताराच्या विरोधाबद्दल मला बोलायचे नाही. नामविस्ताचा शेवट गोड झाला आहे. सर्व बहुजन समाज आजचा दिवस दिवाळी सणासारखा साजरा करत आहे. नामविस्ताराचा निर्णय म्हणजे जगभरातील महिल्यांना सन्मान देणारा आहे. शिक्षणासाठी धडपड  करणा:यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे.

 

Web Title: The name extends the credit to everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.