Nanded bypoll election result 2024 Live Update: एकीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय याची उत्सुकता लागलेली आहे. अशातच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची आकडेवारी येत आहे.
नांदेडमधून भाजपाचे संतुकराव हंबर्डे 14,718 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे रविंद्र चव्हाण हे पिछाडीवर आहेत. दोघांमध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यांत मोठी टफ फाईट सुरु होती. पाचव्या फेरीअखेर हंबर्डे आघाडीवर होते.
तर सहाव्या फेरीअखेर हंबर्डे, भाजपा: 1,49,674 व चव्हाण, काँग्रेस: 1,35,542 मते मिळाली आहेत. यात हंबर्डे 14132 मतांनी आघाडीवर आहेत.
या निवडणुकीत प्रमुख पक्षांसह २३ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ग्रामीण भागात शहरी केंद्रांपेक्षा लक्षणीयरित्या जास्त मतदान झाले. भोकर मतदारसंघात 76% मतदान झाले, त्यानंतर नायगाव (74%), मुखेड (70%) आणि देगलूर (63%). नांदेड दक्षिण (64%) आणि नांदेड उत्तर (61%) सारख्या शहरी मतदारसंघांनी तुलनेने कमी सहभाग नोंदविला.