नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:20 AM2021-09-22T10:20:54+5:302021-09-22T10:21:45+5:30

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Nanded's son V. R. Chaidhary will be the new Air Chief Marshal | नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

googlenewsNext

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातीलनांदेड जिल्ह्याचे सुपुत्र  एअर मार्शल विवेक राम चौधरी (V. R. Chaidhary) हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख (एअर चीफ मार्शल) असतील. 

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

देशाचे नवे एअरचीफ मार्शल विवेक चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या छोट्याशा गावाचे रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या मिल्ट्री स्कुलला गेले. 
 
विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. विवेक यांचे काका दिनकर आणि रत्नाकर हे सध्या नांदेडला वास्तव्याला आहेत. 
 
Web Title: Nanded's son V. R. Chaidhary will be the new Air Chief Marshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.