आता़...पोलिसांकडे करा तक्रार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:08 PM2017-09-19T17:08:44+5:302017-09-19T17:12:36+5:30

nashik,police,complaint,online,on,website | आता़...पोलिसांकडे करा तक्रार आॅनलाईन

आता़...पोलिसांकडे करा तक्रार आॅनलाईन

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील चकरा होणार कमी ; संकेतस्थळावर २३प्रकारच्या सुविधा पोलिस कार्यवाहीची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवरदखलपात्र गुन्हा असेल तर फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार दाखल करता येणार असून त्यांच्या पोलीस ठाण्यातील चकरा कमी होणार आहेत़ विशेष म्हणजे तक्रारीबाबत पोलिसांनी काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाणार असून दखलपात्र गुन्हा असेल तर त्वरीत एफआयआर दाखल केली जाईल़ विशेष म्हणजे याच पोर्टलवर राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा (एफआयआर), हरविलेल्या व्यक्ती, अनोळखी मृतदेह यांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
नाशिक पोलीस आयुक्तालयात संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते महाराष्ट पोलीस दलाच्या ई- पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले़ त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, www.mhpolice.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नागरिकांसाठी २३ विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ यापैकी नऊ सुविधांसाठी लॉग ईन आयडी/पासवर्डची आवश्यकता नसून उर्वरीत १३ सुविधांसाठी रजिस्टेशन करून लॉगईन आयडी व पासवर्डची आवश्यकता असणार आहे़ या पोर्टलद्वारे गणपती वा नवरात्रौत्सवाची परवानगीसाठी मंडळांना आॅनलाईन अर्ज करता येणार आहे़
राष्ट्रीय सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संवेदनशील गुन्हे वा महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची (विनयभंग, बलात्कार) माहिती मात्र या पोर्टलद्वारे मिळणार नाही़ तसेच यापैकी दाखल कोणते गुन्हे पोर्टलवर टाकण्याचे अधिकार पोलिसांना असणार आहे़ या पोर्टलमुळे पोलिसांचे काम वाढणार असले तरी नागरिकांना सुविधा मिळणार असून ही काळाची गरज आहे़ नागरिकांना आपल्या मोबाईलवरून तक्रार करता येणार असली तरी दखलपात्र गुन्हा असेल तर त्याची फि र्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावेच लागणार आहे़ पोर्टलप्रमाणेच अ‍ॅप तयार करण्याचेही काम सुरू असून नागरिकांना अवैध धंद्यांबाबत माहिती द्यायची असेल व नाव गुप्त ठेवायचे असेल तर त्याची व्यवस्थाही या पोर्टलमध्ये आहे़
पोलीस दलाच्या या ई- पोर्टलची उपयोगीता व महत्त्व हे पोर्टलचा वापर करणारे नागरिक व त्याची दखल घेणारे पोलीस अशा दोहोंवर अवलंबून असल्याचे संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडल दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आदींसह सहायक पोलीस आयुक्त व वरीष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

Web Title: nashik,police,complaint,online,on,website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.