राष्ट्रीय ग्राहक आयोग आॅक्टोबरपासून पुण्यात
By admin | Published: August 18, 2015 12:55 AM2015-08-18T00:55:34+5:302015-08-18T00:55:34+5:30
दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात सुरू असलेले खटले पुण्यातच निकाली काढण्याची सुवर्णसंधी राज्यातील नागरिकांना मिळणार आहे. येत्या ५ ते १६ आॅक्टोबर
पुणे : दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात सुरू असलेले खटले पुण्यातच निकाली काढण्याची सुवर्णसंधी राज्यातील नागरिकांना मिळणार आहे. येत्या ५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे सर्किट बेंच खटल्याच्या सुनावणीसाठी पुण्यात येणार आहे.
ग्राहकांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना दाद मागण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण मंचात जाता येते मात्र तेथे न्याय न मिळाल्यास ते राज्य ग्राहक आयोग ते राष्ट्रीय ग्राहक आयोगापर्यत जाऊ शकतात. राज्य ग्राहक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात थेट दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागावी लागते.
देशातील बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोचीन, कोलकाता, अहमदाबाद, भोपाळ, नागपूर, चंदीगढ, लखनऊ आणि पुणे या शहरांत सुनावणीसाठी राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे सर्किटे बेंच जात असते. (प्रतिनिधी)