‘एनसीबी’चे समीर वानखडे यांचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध वाशिम सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी मलिक किंवा त्यांच्यावतीने वकील हजर नसल्याने पुढील सुनावणी १ जानेवारी २०२२ रोजी ठेवण्यात आली.
यांनी समीर वानखडे यांच्याविरुद्ध जातीवाचक वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत संजय वानखडे यांनी ॲड. उदय देशमुख यांच्यामार्फत वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली. यावर १३ डिसेंबरला सुनावणी होती.
वाशिम जिल्हा न्यायालयाने मलिक यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचा आदेश घेऊन कुर्ला पोलीस स्टेशनचे कर्मचारी तीन दिवस मलिक यांच्या बंगल्यावर गेले असता ते नसल्याचे सांगण्यात आले.