“२०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु होते”: छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:36 AM2024-04-12T09:36:58+5:302024-04-12T09:37:47+5:30

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासूनच प्रयत्न सुरू होते, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ncp ajit pawar group chhagan bhujbal said since 2014 sharad pawar trying to alliance with bjp nda | “२०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु होते”: छगन भुजबळ

“२०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु होते”: छगन भुजबळ

NCP Ajit Pawar Group Chhagan Bhujbal News: जेव्हा राजकारणाचा प्रश्न येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा आम्ही शरद पवारांना भेटायला गेलो. त्यांना विनंती केली की, आमच्याबरोबर या. आम्हाला तुमच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. काही दिवसांनी पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झाली. यातून असे संकेत दिसत होते की, आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती. शरद पवार ५० टक्के तयार होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेलांनी केला. यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या दाव्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, आता या निवडणुकीत त्यावर काही बोलणार नाही. आधीदेखील या विषयासंदर्भात बोललो आहे. पण हे सत्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी यावर भाष्य करताना मोठे विधान केले आहे. 

२०१४ पासूनच भाजपासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरु होते

मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, प्रफुल्ल पटेल नेमके काय बोलले हे ऐकले नाही. मात्र, शरद पवारांनी आधीही भाजपाप्रणित एनडीएत जाण्याचा प्रयत्न केलेला. २०१४ च्या निवडणुकीत शरद पवारांनी तसा प्रयत्न केला होता. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपात बिनसले. भाजपाचे बहुमतापेक्षा थोडे कमी आमदार होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. तेव्हापासूनच हे सगळे चालले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार असे कधी म्हटले नाहीत. हेच लोक सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील, त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय-काय बोलणार? शरद पवार यांना पक्षसंघटना एकत्रित ठेवायची होती. मजबूत ठेवायची होती. त्यामुळे असे कोणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल, असे राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
 

Web Title: ncp ajit pawar group chhagan bhujbal said since 2014 sharad pawar trying to alliance with bjp nda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.