शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

निवडणुका खिलाडूवृत्तीने लढवाव्या, यंत्रणांचा गैरवापर चुकीचा; रोहित पवारांची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 5:21 PM

pandharpur bypoll: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देरोहित पवार यांची भाजपवर टीकाफेसबुकच्या माध्यमातून साधला निशाणायंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही - पवार

मुंबई : देशात एकीकडे कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. तर, दुसरीकडे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून, प्रचारसभांना वेग आला आहे. महाराष्ट्रातही पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (rohit pawar criticises bjp on bypoll)

रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आसामच्या राताबरीमध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत EVM मशीन सापडण्याची घटना समोर आली. हे अत्यंत धक्कादायक आहे. निवडणूक आयोगाने जरी दोषींवर कारवाईचे निर्देश दिले असले तरी वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे सामान्य मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबाबत शंका निर्माण होते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

“रोजगार बुडणाऱ्यांना भरपाई द्या, नंतरच लॉकडाऊन करा आणि जमत नसेल तर...” 

ऐन निवडणुकीत छापे मारण्याची घटना

रोहित पवार पुढे म्हणतात की, सध्या आसामबरोबर तमिळनाडूही निवडणुकांना सामोरं जात आहे. तमिळनाडूमध्ये जरी ईव्हीएम सापडले नसले तरी  डी.एम.के पक्ष प्रमुख एम. के स्टॅलिन यांच्या जावयाच्या घरावर ऐन निवडणुकीत छापे मारण्याची घटना ही अनेक शंका उपस्थित करणारी आहे. इन्कम टॅक्स विभाग, ई.डी यासारख्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी लोकांची मने दूषित करण्यासाठी व निवडणुकांनंतर दबाव टाकून सत्ता स्थापन करण्यासाठी या संस्थांचा उपयोग केला जातो का? अशी सार्वत्रिक चर्चा आता ऐकायला मिळते, असेही पवार यांनी सांगितले. 

“प्लेगच्या साथीवेळी रँडने लोकांवर अत्याचार केले, तसा अनुभव राज्यातील जनता सध्या घेतेय”

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना बदनाम करण्याचा डाव

निवडणुका असलेल्या राज्यातच ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय संस्था सक्रिय होताना दिसतात, हे बंगाल आणि तमिळनाडू निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ठळकपणे दिसून आलं. ममता बॅनर्जी यांच्या नातलगांच्या घरी छापे मारण्याची घटना असो की स्टॅलिन यांच्या मुलीच्या घरी इन्कम टॅक्सने मारलेले छापे असो! यातून निष्पन्न काहीच झालं नाही. केवळ निवडणूकीच्या तोंडावर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा डाव असून हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. केवळ एखादी निवडणूक जिंकण्यासाठी देशाच्या लोकशाहीला आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेलाच गुंडाळून ठेवणं कितपत योग्य आहे?, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे. 

कोरोना पळून गेलाय, मास्क घालण्याची गरज नाही; भाजप मंत्र्याचा अजब दावा

बंगालची वाघीण एकटी ताकदीने लढतेय

पश्चिम बंगालचा विचार करायचा झाल्यास एकट्या ममता बॅनर्जींच्या विरोधात एक मोठी शक्ती साम, दाम, दंड, भेद आणि सत्ता याचा वापर करताना दिसतेय. पण बंगालची ही वाघीण न डगमगता एकटी या ताकदीच्या विरोधात धैर्याने उभी आहे. इथली सत्ता कुणाला मिळेल याचा योग्य निर्णय ही बंगालची जनता घेईलच, पण निवडणुका या कुणाच्या दबावाखाली होता कामा नये, याची काळजी निष्पक्ष आणि स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगानेही घेणं गरजेचं आहे, असेही रोहित पवार म्हणाले. 

लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

यंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही

निवडणुका या एखाद्या खेळासारख्या असतात. त्या तशाच खिलाडूवृत्तीने लढवायच्या असतात. पण यामध्ये दडपशाही आणि यंत्रणांचा गैरवापर झाला तर ती लोकशाही राहत नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वप्नांचाही खेळ होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याची गरज आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPandharpurपंढरपूरElectionनिवडणूक