शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
2
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
3
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
4
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
5
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
6
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
7
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
8
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
9
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
10
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
11
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
12
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
13
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
14
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
15
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
16
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
17
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
18
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
19
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!

जातपंचायतीच्या प्रकरणाला नवे वळण!

By admin | Published: January 21, 2016 3:41 AM

गोंधळी जातपंचायतीने वाळीत टाकल्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. दीपक भोरेंचे जातपंचायतीवरील आरोप निराधार असल्याचा दावा पंच कमिटीने केला आहे.

परभणी : गोंधळी जातपंचायतीने वाळीत टाकल्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. दीपक भोरेंचे जातपंचायतीवरील आरोप निराधार असल्याचा दावा पंच कमिटीने केला आहे.दीपक भोरे हे सेलू येथे भिसी चालवित होते़ गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन ते पळाले. तीन वर्षांपासून त्यांच्या सासऱ्याने त्यांना लपवून ठेवले होते़ त्यानंतर आता जातपंचायतीच्या नावाने ते करीत असलेले आरोप निराधार असल्याचे जातपंचायतीचे अध्यक्ष फकीरा भोरे यांचा मुलगा भारत भोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़कर्जाच्या पैशांसाठी जात पंचायतीने वाळीत टाकल्याचे दीपक भोरे यांनी नाशिकमध्ये सांगितले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचीही मदत घेतली. सेलू येथील दीपक व सोनी भोरे हे दाम्पत्य सध्या नाशिकमध्ये आहे. भोरे यांनी पंचांकडून ९० हजार रुपये कर्ज घेतले होते़ तीनपट व्याज भरल्यानंतरही सहा ते सात लाख रुपयांची मागणी पंचांकडून केली जात आहे, तसेच धमकी दिली जात असल्याचे त्यांनी नाशिकमध्ये सांगितले.जात पंचायतीचे अध्यक्ष फकीरा भोरे यांच्याशी संपर्क साधला असता, फोनवरून त्यांचा मुलगा भारत भोरे यांनी माहिती दिली. भिसीचे ८० ते ९० हजार रुपये घेऊन दीपक पळून गेला आहे़ तीन वर्षांपासून तो गायब होता़ दीपकचे सासरे देवकुमार उघडे, सुभाष उघडे यांनीच त्याला नाशिक येथे लपवून ठेवले होते़ दीपकचा ठावठिकाणा लागल्यानंतर काहींनी त्याच्याकडे गोरगरीब लोकांच्या पैशांची मागणी केली़ त्यातून वाद झाला असेल़ मात्र समाजातील गोरगरीब लोकांचे पैसे परत मिळावेत, एवढ्याच प्रामाणिक उद्देशाने दीपक भोरे याला वाळपत्र दिले़ परंतु समाजातून वाळीत टाकण्याचा आम्हाला अधिकार नाही़ त्यामुळे असे काही केलेले नाही़, असेही भारत भोरे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)