नाशिक : अजमेर येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर, मारुती व्हॅन आणि मालट्रक यांच्यात मंगळवारी मध्यरात्री मनमाडजवळ झालेल्या विचित्र अपघातात नऊ जण जागीच ठार, तर नऊ जण जखमी झाले. मनमाड-मालेगाव राज्य मार्गावरील चोंढी घाटाजवळ कानडगाव शिवारात मनमाडहून मालेगावकडे जात असलेल्या मालट्रकला समोरून भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. त्याचवेळी ट्रकला ओव्हरटेक करीत असलेली मारुती व्हॅन अपघातग्रस्त वाहनांवर धडकली. अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील आतिक रमजान तांबोळी (३५), नाजमीन आतिक तांबोळी (१६, दोघेही रा. मनमाड), सायमा निसार तांबोळी (८), हसीना रशीद तांबोळी (५५), तन्वीर निसार तांबोळी (६, रा. कोळगाव थडी- कोळपेवाडी); तर मारुती व्हॅनचे चालक प्रशांत सुरेश महाजन (रा. मालेगाव) व त्यातील प्रवासी विशाल गणेश शेटे (३६, रा. धुळे), अब्दुल कुद्दूस हाजी मोहंमद शफी (५८) व मोहंमद आरीफ मोहंमद फारुक इरशत (४२, रा. मालेगाव) यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
मनमाडजवळ विचित्र अपघातात नऊ ठार
By admin | Published: June 11, 2015 1:22 AM