Lockdown News: महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 05:04 PM2021-04-04T17:04:53+5:302021-04-04T17:08:03+5:30

CM Uddhav Thackeray's meeting On Lockdown: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असून सायंकाळी नव्या गाईडलाईन जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

No lockdown in Maharashtra, strict restrictions till April 30? Discussion in the Cabinet meeting of CM Uddhav Thackeray | Lockdown News: महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

Lockdown News: महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही, 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध? मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

Next

राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मंत्रिमंडळाची तातडीची (Cabinate meeting) बैठक बोलावली आहे. या बैठकीत लॉकडाऊन नाही (No lockdown in Maharashtra), तर येत्या एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करणार असल्यावर मतैक्य झाल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे राज्यावरील लॉकडाऊनची टांगती तलवार तुर्तास टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (No lockdown in Maharashtra, Strict restrictions till April 30, 2021 )


राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असून सायंकाळी नव्या गाईडलाईन जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी बोलताना आता लॉकडाऊन करण्याची वेळ आल्याचे सांगितले होते. हळूहळू निर्बंध लादून लोक ऐकत नाहीत. यामुळे आधी संपूर्ण लॉकडाऊन आणि नंतर हळूहळू सूट देण्याची योजना असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. 


मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. यामध्ये त्यांनी राज्यात कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता आहे, राज्यातील कोरोना परिस्थिती वाईट झाली आहे, यामुळे सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. यावर दोन्ही नेत्यांकडून सरकारला अपेक्षित सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर मनसेने सर्व नेत्यांना कोरोनावरील सरकार उचलत असलेल्या पावलांना विरोध करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत. 


या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध यावर चर्चा सुरु आहे. यामध्ये निर्बंय़ध लादल्यास काय नियम असावेत, कोणाला सूट द्यावी, कोणत्या कार्यक्रमांवर बंदी आणावी आदी बाबींवर चर्चा सुरु आहे. एबीपी माझाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात लॉकडाऊन होणार नाही. तर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध घालण्यात येणार आहेत. पुण्यात आधीच मिनी लॉकडाऊन (Mini Lockdown in Pune) सुरु झाला आहे. तसाच मुंबईतही सुरु करून उर्वरित राज्यात अन्य नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. अद्याप मंत्रिमंडळ बैठक सुरु असून त्यानंतरच गाईडलाईनची घोषणा होणार आहे.

 

Web Title: No lockdown in Maharashtra, strict restrictions till April 30? Discussion in the Cabinet meeting of CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.