खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही, कंगनावर भावोजी चिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:34 PM2020-09-05T17:34:07+5:302020-09-05T17:40:44+5:30

कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते.

No one becomes the queen of Jhansi by sitting on a false horse, adesh bandekar on kangana ranout | खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही, कंगनावर भावोजी चिडले

खोट्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही, कंगनावर भावोजी चिडले

Next
ठळक मुद्देकंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते.

मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर चांगल्याच आक्रमक झालेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सध्या तुंबळ शाब्दिक लढाई जुंपली आहे. त्यात कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पीओकेशी केल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा समोर आला आहे. त्यानंतर, दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू होते. तर कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनीही या वादावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तर, कंगनाने मी मराठा असून झांसीच्या राणीबाईंच्या जीवनावर चित्रपट केल्याचे म्हटले. त्यानंतर, सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी कंगनाला लक्ष्य केले आहे.

कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर देशभरातून आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणातून कंगनावर टीका करण्यात आली. त्यानंतर, मी छत्रपती शिवाजी महाराज आणि झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनविल्याचे कंगनाने ट्विट केले होते. त्यावरही, अनेकांनी कंगनाला लक्ष्य केले. होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांनीही कंगनावर टीका केली. ''खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही.. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली...कुणालाही राणी ची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही'', असे बांदेकर यांनी म्हटले आहे. बांदेकर यांनी कंगनाला आपल्या ट्विटरवरुन लक्ष्य केले. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना राणौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादावर अमृता फडणवीस यांनी कुणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, ''आपण एखाद्याच्या मताशी सहमत असू शकत नाही. मात्र तरीही आपण लोकशाहीने दिलेल्या मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचा मान राखला पाहिजे. बोलण्याचे, व्यक्त होण्याचे, चळवळ करण्याचे आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या मताशी असहमत असाल तर त्याला प्रतिवाद करा. पण म्हणून विरोधी मत व्यक्त करणाऱ्याच्या पोस्टरला चपलांनी मारणे हे काही योग्य नाही.''

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही कंगनाची पाठराखण केली आहे. त्यांनी आरपीआय तिला संरक्षण देणार असल्याचे जाहीर करताना सत्ताधारी शिवसेनेलाही सुनावलं आहे.  लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणौतने मुंबईवर टीका केली नसून  राज्यसरकार वर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगनाला संरक्षण देईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

काय म्हणाली होती कंगना?
संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावादेखील तिनं केला आहे. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.  

शुक्रवारी कशावरून सुरू झाला वाद?
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने असे म्हटले आहे. "कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?" असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.

संजय राऊत यांनी सुनावलं
"मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Web Title: No one becomes the queen of Jhansi by sitting on a false horse, adesh bandekar on kangana ranout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.