‘मुदतपूर्व कर्ज फेडल्यास दंड नको’
By admin | Published: May 7, 2014 11:52 PM2014-05-07T23:52:49+5:302014-05-08T14:20:45+5:30
बँकेचे कर्ज मुदतीपूर्वी फेडणाऱ्या ग्राहकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. फ्लोटिंग दराने घेतलेले कर्ज वेळे अगोदर परत केल्यास त्यावर दंड आकारू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना दिले.
मुंबई : बँकेचे कर्ज मुदतीपूर्वी फेडणाऱ्या ग्राहकांना आरबीआयने दिलासा दिला आहे. फ्लोटिंग दराने घेतलेले कर्ज वेळे अगोदर परत केल्यास त्यावर दंड आकारू नये, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना दिले. रिझर्व्ह बँकेने सांगितले की, फ्लोटिंग दराने दिलेल्या व्यक्तिगत कर्ज मुदतीच्या आधी बँकेला परत केल्यास त्यावर दंड लावू नये. हा निर्णय सर्व बँकांना लगेचच लागू होईल. फ्लोटिंग कर्जात गृह, कॉर्पोरेट, वाहन आणि व्यक्तिगत कर्जांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात धोरणात्मक बैठकीत म्हटले होते की, वेळेअगोदर फ्लोटिंग कर्ज फेडणार्या ग्राहकांना सुविधा देण्याबाबत विचार होणे गरजेचे आहे. काही बँकांकडून मुदतपूर्व कर्ज फेडल्यास उर्वरित रकमेवर २ टक्के पूर्व भरणा शुल्क आकारला जात आहे. आरबीआयने दोन वर्षांपूर्वी गृह कर्ज मुदतपूर्व फेडल्यास त्यावरील दंड रद्द केला होता. गृह कर्जाचा मुदतपूर्व भरणा शुल्क रद्द केल्यास ग्राहकांतील भेदभाव कमी होईल. (प्रतिनिधी)
तसेच बँकामधील प्रतिस्पर्धेमुळे गृह कर्जासाठी फ्लोटिंग आधारे चांगल्या दराने कर्ज मिळणे शक्य होईल. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आरबीआय प्रयत्नशील आहे. त्याचा एक भाग म्हणून ग्राहकांच्या खात्यात किमान रक्कम नसेल, तरीही दंड आकारू नये, असे स्पष्ट निर्देश आरबीआयने दिले आहे.