खासगी बसकडून जादा भाडे वसुली : जादा भाडे आकारणाऱ्या १३ चालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:07 AM2018-05-08T05:07:23+5:302018-05-08T05:07:23+5:30

खासगी बस चालकांकडून जादा तिकीट भाडे आकारणी विरोधात मुंबई-पुणे शहरांतून कारवाईचा श्री गणेशा करण्यात आला आहे. संबंधित परिवहन कार्यालयांनी मुंबई-पुणे येथील एकूण १३ खासगी बसवर दंडात्मक कारवाई आणि कारणे दाखवा अन्यथा परवाना रद्द नोटीस पाठवल्या आहेत.

 Notice to private Bus operator news | खासगी बसकडून जादा भाडे वसुली : जादा भाडे आकारणाऱ्या १३ चालकांना नोटीस

खासगी बसकडून जादा भाडे वसुली : जादा भाडे आकारणाऱ्या १३ चालकांना नोटीस

Next

मुंबई : खासगी बस चालकांकडून जादा तिकीट भाडे आकारणी विरोधात मुंबई-पुणे शहरांतून कारवाईचा श्री गणेशा करण्यात आला आहे. संबंधित परिवहन कार्यालयांनी मुंबई-पुणे येथील एकूण १३ खासगी बसवर दंडात्मक कारवाई आणि कारणे दाखवा अन्यथा परवाना रद्द नोटीस पाठवल्या आहेत. खासगी बस चालक-मालकांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित बसचा परवाना रद्द करण्यात येईल,परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यात कंत्राटी बसमधून प्रवास करणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात मुंबई-पुणे येथून सर्वाधिक खासगी बस राज्याच्या विविध शहरांसाठी धावतात. परिणामी मुंबई-पुणे शहरातून संबंधित परिवहन कार्यालयांनी खासगी बस चालकांच्या मुजोरपणाला वेसण घालण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई शहरातील ५ खासगी वातानुकूलित शयनयान बस चालकांना ‘कारणे दाखवा अन्यथा परवाना रद्द’ अशा नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. तर पुणे येथील ८ दोषी खासगी वातानुकूलित शयनयान बसवर दंडात्मक कारवाई करुन २२ हजार ७४३ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खासगी बस चालकांकडून जादा भाडे आकारणाºया विरोधात तक्रार करण्यासाठी प्रवासी पुढाकार घेत आहे. मात्र तक्रार करताना अधिक तपशीलवार माहिती मिळाल्यास संबंधित खासगी बसवर त्वरीत कारवाई करणे शक्य आहे, अशी माहिती परिवहन आयुक्तालयाने दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) टप्पा वाहतूक करणाºया बसच्या प्रति किलोमीटर भाडेदरापेक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. या बाबत २७ एप्रिल रोजी शासन निर्णय देखील झाला. मात्र तरी देखील खासगी बस चालकांकडून प्रवाशांची ‘जादा’ आर्थिक लूबाडणूक सुरुच होती.

तक्रार करताना ‘ही’ माहिती आवश्य द्या
खासगी बसचालकांकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करण्यासाठी ०२२-६२४२६६६६ आणि १८००२२०११० (मुंबई) या निशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रार करताना खालील माहिती घेतल्यास संबंधित बसवर त्वरित कारवाई शक्य आहे.

च्खासगी बसचा क्रमांक
च्प्रवासी टप्पा (कोठून ते कुठ पर्यंत)
च्प्रवासी तारीख, वेळ
च्खासगी बस तिकिट भरल्याच्या पावतीचा तपशील

...तर परवाना रद्द : खासगी बसच्या अवाजवी तिकीट आकारणीविरोधात मुंबई-पुण्यासह राज्यभर कारवाई सुरु केलेली आहे. मुंबईत शनिवारी खासगी बस चालकांना अवाजवी तिकिट आकारणी विरोधात नोटिस पाठवण्यात आली आहे. सदर खासगी बसला कार्यालयीन तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून या काळात खासगी बसचालक-मालकांकडून प्रतिसाद न आल्यास संबंधित खासगी बसचा परवाना रद्द करण्यात येईल.
- स.बा.सहस्त्रबुद्धे, अपर परिवहन आयुक्त

Web Title:  Notice to private Bus operator news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.