मुंबई : मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन आता नागपूरला तर उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यासाठी सरकारच्या हलचाली सुर झाल्या आहेत. काल याबबात मंत्रीमंडळाची चर्चा झाली आहे. यासाठी तीन जणांची उपसमिती नेमून निर्णय घेतला जाणार असल्याचंही समजतं आहे.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत काल (गुरुवार) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी तीन जणांची उपसमिती नेमून निर्णय घेतला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहे.
4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस मिळत नाहीत. तसंच कामाला गती देण्यासाठी हे अधिवेशन गरजेचं असल्यानं नागपुरातच पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार सकारत्मक आहे.