दहावीचा आॅनलाइन निकाल आज
By Admin | Published: June 6, 2016 03:42 AM2016-06-06T03:42:05+5:302016-06-06T10:51:47+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, ६ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, ६ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिकांचे वाटप १५ जूनला शाळांमध्ये केले जाईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.
राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्गत १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर व मोबाइलद्वारे दुपारी १ वाजता निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनला दुपारी ३ वाजता गुणपत्रिका, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख व कलचाचणीच्या अहवालाचेही वाटप केले जाणार आहे. जुलै-आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. या संदर्भातील तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जाणार आहेत.
या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध :