मुद्रांकाचे होणार आॅनलाईन ट्रॅकिंग

By Admin | Published: May 7, 2014 11:38 PM2014-05-07T23:38:16+5:302014-05-07T23:38:16+5:30

मुद्रांक छापल्यापासून ते कोणत्या ग्राहकाने तो खरेदी केला याचे ट्रॅकिंग (नजर ठेवणे) करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने हाती घेतला आहे.

Online tracking of stamp will be done | मुद्रांकाचे होणार आॅनलाईन ट्रॅकिंग

मुद्रांकाचे होणार आॅनलाईन ट्रॅकिंग

googlenewsNext

विशाल शिर्के -

पुणे तेलगी मुद्रांक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आता मुद्रणालयात मुद्रांक छापल्यापासून ते कोणत्या ग्राहकाने तो खरेदी केला याचे ट्रॅकिंग (नजर ठेवणे) करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने हाती घेतला आहे. महिनाभरात हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. त्यामुळे एका क्लिकवर मुद्रांकाचा प्रवास व वापराची माहिती समजणार आहे. देशभर गाजलेल्या मुद्रांकाच्या तेलगी गैरव्यवहारानंतर २००६ पासून मुद्रांकावर सिरियल क्रमांक छापण्यास सुरुवात झाली, तसेच मुद्रांकाच्या रचनेत चलनी नोटांप्रमाणे काही बदलदेखील केले आहेत. नाशिक येथील सिक्युरिटी प्रेसमध्ये मुद्रांक छापल्यानंतर ते प्रधान मुद्रांक कार्यालयात येतात. त्यानंतर जिल्हा कोषागार, उपकोषागार असा प्रवास करीत परवानाधारक विक्रेत्याकडे मुद्रांक जातात. त्यानंतर खरेदीदार-पक्षकाराला त्याची विक्री होते. मुद्रांकावर सिरियल क्रमांक छापण्यात येत असल्याने कोणत्या जिल्ह्याला, कोणत्या विक्रेत्याला कोणत्या सिरियल क्रमांकाचा मुद्रांक वितरित झाला, याची माहिती संकेतस्थळावर असणार आहे. सह नोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते म्हणाले, प्रधान मुद्रांक कार्यालयातर्फे मुद्रांक ट्रॅक करण्याची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयातर्फे वाटप झालेल्या मुद्रांकाचाच नोंदणीसाठी वापर होतो की नाही, हे समजणार आहे. सर्व प्रकारच्या मुद्रांकाचे ट्रॅकिंग करणे शक्य होणार असल्याने मुद्रांकातील गैरव्यवहाराला आळा बसेल. तसेच मुद्रांकामार्फत होणारा व्यवहार अधिक सुरक्षित होईल. तसेच या प्रणालीला नोंदणीची (रजिस्ट्रेशन) जोड देण्यात येणार असल्याने किती मुद्रांकांची नोंदणी झाली, याची पडताळणी होईल. मुद्रांक शुल्क चुकविण्याच्या प्रवृत्तीला देखील चाप लावता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक सिक्युअर बँक अँड ट्रेझरी रिसिट (ईएसबीटीआर) या मार्फत पाच हजार रुपयांवरील मुद्रांक आॅनलाईन देण्याची सोयदेखील करण्यात येणार आहे. विविध बँकांमार्फत त्याचे वितरण केले जाईल. त्या मुद्रांकाचे शुल्क राज्य सरकारच्या गव्हर्नमेंट रिसिट अकाऊंटिंग सिस्टीम अर्थात ‘ग्रास’ या संकेतस्थळावरून करावे लागेल, असे डॉ. कोलते यांनी स्पष्ट केले.

- दस्त नोंदणीसाठी ५, १० व २५ हजार रुपयांचा मुद्रांक वापरण्यात येत असेल, तर अशा मुद्रांकाचा विक्री नोंदवही क्रमांक, खरेदीदाराचे नाव, रक्कम असलेला संक्षिप्त मजकूर एसएमएसद्वारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाला तात्काळ पाठवावा लागणार आहे. ४एखाद्या प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाला विक्रेत्यांचा एसएमएस मिळाला नसल्यास या कार्यालयाने विक्रेत्याशी संपर्क साधून मुद्रांक विक्रीची खातरजमा करावी. अशा संशयास्पद प्रकरणात दुय्यम निबंधकांनी मुद्रांकाची अल्ट्राव्हायलेट दिव्याखाली तपासणी करावी. तसा शेरा दस्तावर नमूद करावा.

- मद्रांकाबाबत संशय असल्यास मूळ मुद्रांक नाशिक मुद्रणालयाकडे पाठवावा, अशी सूचनादेखील करण्यात आली आहे, तसेच मुद्रांकावर तारीख व त्याच्या हेतूचा शिक्का छापणे बंधनकारक केल्याने त्याच हेतूसाठी वापर करता येईल.

Web Title: Online tracking of stamp will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.