पुणे: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून आत्तापर्यंत राज्य भरातून केवळ आडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. येत्या १६ जून रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे.विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र मिळविण्यास उशीर होत असल्याने प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी,अशी मागणी प्रशिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे. डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १६ जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे. तसेच १७ जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी २० जून रोजी प्रसिध्द केली होणार असून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गुणवत्ता यादीवर हस्तक्षेप स्वीकारले जातील. प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रवेशाची पहिली यादी २४ जून रोजी प्रसिध्द केली जाईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना २४ ते २७ जून या कालावधीत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. प्रवेशाची दुसरी यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून ४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदत दिली जाईल. तसेच तिस-या यादीतील विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात येत्या ८ ते ११ जुलै रोजी प्रवेश मिळतील. महाराष्ट्र प्रशिक्षण परिषदेने या पध्दतीने डीएड प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले असले तरी अनेक विद्यार्थी अद्याप अर्ज करू शकले नाहीत.त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असल्याचे प्रशिक्षण परिषदेच्या अधिका-यांनी सांगितले.राज्य मंडळाच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ११ जून रोजी गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.तसेच डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ लागत आहे.येत्या रविवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार असून आत्तापर्यंत राज्यातील केवळ २,४३४ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत.खुल्या संवर्गातील ५० टक्के आणि मागासवर्गीय संवर्गातील ४५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना डीएड अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात आहे.राज्यातील अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयातील हजारो जागा रिक्त राहत आहेत.त्यामुळे प्रवेश अर्ज करणा-या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळत आहे.-----------------------वर्ष महाविद्यालय संख्या प्रवेश क्षमता झालेले प्रवेश २०१६-१७ ९८९ ६२,७३३ २०,२०४२०१७-१८ ९४९ ६०,२३३ १७,८७५२०१८-१९ ८४७ ५५,६४४ १७,०९२
डीएड प्रवेशासाठी केवळ अडीच हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 6:00 AM
डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३१ मे पासून सुरू झाली असून विद्यार्थ्यांना येत्या १६ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास संधी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे येत्या १६ जून रोजी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या २३ जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार