ऑक्सिजन बेड व संसर्गाच्या दरावरून ठरणार अनलॉक, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच स्तरांमध्ये वर्गीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 06:37 AM2021-06-06T06:37:59+5:302021-06-06T06:39:23+5:30

Oxygen beds and contamination rates will be unlocked : ज्या जिल्ह्याची किंवा शहराची गणणा स्तर १ मध्ये करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यात सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू  राहतील. याउलट स्तर ५ आलेल्या जिल्ह्यात काही बंधणे लावण्यात आली आहेत.

Oxygen beds and contamination rates will be unlocked, classifying all the districts in the state into five levels. | ऑक्सिजन बेड व संसर्गाच्या दरावरून ठरणार अनलॉक, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच स्तरांमध्ये वर्गीकरण

ऑक्सिजन बेड व संसर्गाच्या दरावरून ठरणार अनलॉक, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पाच स्तरांमध्ये वर्गीकरण

Next

मुंबई:  प्रत्येक जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाचा दर किती आहे व उपलब्ध ऑक्सिजन बेड किती भरले आहेत, यावरून त्या जिल्ह्याचा  स्तर ठरवण्यात आला आहे. ज्या जिल्ह्याची किंवा शहराची गणणा स्तर १ मध्ये करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यात सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू  राहतील. याउलट स्तर ५ आलेल्या जिल्ह्यात काही बंधणे लावण्यात आली आहेत. 

स्तर तीन, चार आणि पाच साठी जिथे आस्थापना संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडे असण्याचा उल्लेख असेल त्या ठिकाणी असे अपेक्षित आहे की, हे आस्थापना मालक, दुकानदार व सेवा देणारे तसेच ग्राहक पाच वाजेपर्यंत सर्व आटोपून घरी पोहोचतील. ज्या आवश्यक सेवांसाठी लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे त्यात वैद्यकीय, शासकीय कार्यालय, विमानतळ, बंदरे यांची सेवा समाविष्ट असेल. आवश्यक वाटल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन इतर गोष्टींचा अंतर्भाव करू शकते.

एखाद्या प्रवाशाला पासची आवश्यकता असेल त्या ठिकाणी एका वाहनामध्ये असलेल्या सर्वांसाठी वेगवेगळे पास असणे अभिप्रेत आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेगळे पास लागणार नाहीत. सरकारी कार्यालय आणि आपत्कालीन सर्व सेवा तसेच कोविड व्यवस्थापनासाठी १०० टक्के उपस्थितीसह काम केले जाऊ शकते. 

आवश्यक सेवेमध्ये हे समाविष्ट असेल :
इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.

यांचाही समावेश आवश्यक सेवांमध्ये

-पशुवैद्यकीय सेवा, जनावरांसाठी आश्रय व पशुखाद्य दुकाने.
- किराणा दुकाने, भाजी, फळांचे दुकान, दूध डेरी, बेकरी, मिठाईचे दुकान यांचाही समावेश असेल.
- कोल्ड स्टोरेज आणि वखार सेवा.
- सार्वजनिक वाहतूक- यात विमान, रेल्वे, टॅक्सी, रिक्षा व सार्वजनिक बस. 
- विविध देशांच्या मुत्सद्यांच्या कार्यालयात यातील कार्य.
- मान्सूनपूर्व काम
- स्थानिक प्रशासनातर्फे सर्व सार्वजनिक सेवा
- रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा
- सेबीशी संबंधित सर्व कार्यालये

कार्यालयात कशी असेल उपस्थिती ?
मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती वर दिलेल्या पेक्षा जास्त असू शकते 
परंतु त्यासाठी मुख्य सचिव यांची परवानगी लागेल तर राज्यातल्या इतर भागात त्या त्या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल.
 

आवश्यक सेवेमध्ये हे समाविष्ट असेल :
इस्पितळ, चाचणी केंद्र, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध केंद्र, औषध निर्माण कंपन्या इतर वैद्यकीय सुविधा देणारे तसेच त्याचे उत्पादन आणि वितरण करणारे, त्याची वाहतूक करणारे आणि या चैन मध्ये सामील असणारे सर्वांचा समावेश होईल. त्याचप्रमाणे लसीचे वितरण, सेनीटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व इतर कच्चा माल यालाही आवश्यक सेवा म्हणून गृहीत धरले जाईल.

Web Title: Oxygen beds and contamination rates will be unlocked, classifying all the districts in the state into five levels.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.