मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 10:52 AM2023-02-02T10:52:44+5:302023-02-02T10:53:18+5:30

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे.

Pandharpur 137 devotees admitted to hospital due to poisoning after eating fasting food during Maghi Wari | मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

googlenewsNext

पंढरपूर :

माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी एकादशी दिवशी भगर अन् आमटी खाली त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. यामुळे बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनाठा ते पंढरपूर अशी दिंडी मागील २५ वर्षापासून येते. या दिंडीत भाविक नादेंड व हिंगोली जिल्ह्यातील लोक १८५ च्या आसपास पायी चालत येतात. 
यंदा माघी यात्रा सोहळा साजरी करण्यासाठी दिंडी ३१ जानेवारी रोजी पंढरपुरात आले. त्यांनी पंढरपुरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये मुक्काम केला. त्या भाविकांनी एकादशीच्या उपवासामुळे बुधवारी भगर अन् आमटी खाली. परंतु त्यांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मळमळ, उलट्या व चक्करचा त्रास सुरू झाला. ही माहिती मिळताच त्या ठिकाणी १०८ रुग्णवाहिका पोहचली.  

बाधीत झालेल्या १३७ जणांना गुरुवारी पहाटे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आहे. ही माहिती मिळताच अन्न औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कूचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अन्न औषध प्रशासनाने  विषबाधा झालेल्या अन्न पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले आहे.

उपजिल्हा रुग्णालय १३७ भाविक उपचार घेत आहेत. सर्व भाविकांची प्रकृती स्थिर आहे. 
- महेशकुमार माने, वैद्यकीय अधीक्षक, उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर

Web Title: Pandharpur 137 devotees admitted to hospital due to poisoning after eating fasting food during Maghi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.