सनातनविषयी पुरोगाम्यांना पोटशूळ - सनातन
By admin | Published: June 12, 2016 07:37 PM2016-06-12T19:37:21+5:302016-06-12T19:37:21+5:30
सनातनविषयी पुरोगाम्यांच्या पोटात दुखते आहे, सनातनविषयी अनेकांना पोटशूळ असल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १२ : नरेंद्र दाभोलकरांना विदेशातून कोट्यवधी रुपये मिळत होते. सनातनविषयी पुरोगाम्यांच्या पोटात दुखते आहे, सनातनविषयी अनेकांना पोटशूळ असल्याचा आरोप सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. डॉ. विरेंद्र तावडेला दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक केल्यानंतर सनातनने आपली भूमिका मांडण्यासाठी पुण्यातील पत्रकार भवनात ही परिषद आयोजित केली होती. पुरोगाम्यांबरोबर त्यांनी भाजपावरही तोंडसुख घेतले. ते म्हणाले, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित अशा १२ हिंदूधर्म रक्षकांना फसवण्यात आलं, भाजपा सत्तेत असतानाही हिंदूना तुरुंगात टाकण्यात येत आहे.
सनातनला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, डॉ. तावडेचे वकिलपत्र घेण्यासाठी १०० वकिल तयार आहेत. तावडे हे अतिशय नम्र व्यक्तिमत्व आहे. एका इ मेल मुळे डॉक्टर तावडे ला अटक केली गेली आहे. सीबीआय कुठल्या मार्गाने चाललय हे सनातनला माहीत आहे. किती तपास यंत्रणा आमचा तपास करत असले आणि माध्यम विरोध करत असले तरी आम्ही एक दिवस राष्ट्राला हिंदूतववादी राष्ट्र बनवू. असे त्यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार स्पष्ट केले.
सनातनच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे -
विरेंद्र तावडेसारख्या साधकांना मुद्दाम फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे, वारकरी संप्रदायासह इतर समविचारी संघटना सनातनच्या पाठीशी आहोत, वेळप्रसंगी आंदोलनही करू - हभप श्यामजी महाराज राठोड
भारतीय मुस्लिमांनी काशी, मथुरा आणि अयोध्येमधील जागांवरचा हक्क सोडावा, अन्यथा आत्तापर्यंत मुस्लिमांनी पाडलेल्या ३० हजार मंदिरांचा हिशेब द्यावा लागेल- हभप श्यामजी महाराज राठोड
देशात बहुसंख्य हिंदू असूनही देशात हिंदूंची मुस्कटदाबी होत आहे, देशद्रोही संघटनांना पोलिस संरक्षण देतात आणि हिंदूंनाच पकडतात - हभप श्यामजी महाराज राठोड
सनातन संस्थेला पाठिब्यांसाठी देशभरातून फोन येत आहेत - अभय वर्तक
पुरोगाम्यांच्या टीकेमुळे सनातनचे नुकसान नाही - अभय वर्तक
समीर गायकवाड विरोधात अजुन कोणताही पुरवा नाही - अभय वर्तक
भाजपा सरकारच्या काळातही हिंदूना तुरुगांत टाकलं जात आहे - अभय वर्तक
इथून पुढेही पूरोगाम्याचा चेहरा फाडू