पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:27 PM2019-11-01T12:27:57+5:302019-11-01T14:15:51+5:30

एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले.

Pawar's rally couldn't save defeat of Shahsikant Shinde | पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

पवारांच्या पावसातील सभेनंतरही टळला नाही शशिकांत शिंदेंचा पराभव

Next

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला अनेक धक्के बसले. सहाहून अधिक मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले. तर पक्षांतर करून सत्ताधाऱ्यांना सामील झालेल्या नेत्यांनाही जनतेने जागा दाखवली. मात्र निष्ठा दाखवत आहे तिथच थांबलेल्या काही आमदारांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. विषेश म्हणजे, या नेत्यांना शरद पवारांची पावसातील बहुचर्चित सभाही पराभवापासून वाचवू शकली नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले.  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

राष्ट्रवादीने लोकसभेची साताऱ्याची जागा पुन्हा जिंकून विधानसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी केली. मात्र राष्ट्रवादीचे कोरेगाव मतदार संघातील आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीतून ऑउटगोईंग सुरू असताना शिंदे पक्षातच थांबले होते. निवडणूक प्रचारात शरद पवार यांनी अखेरची सभा साताऱ्यात घेतली होती. ही सभा पावसामुळे चांगलीच गाजली होती.

शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची चर्चा राज्यभर झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला राज्यात नवसंजीवनी मिळणार असं चित्र निर्माण झालं होत. काही प्रमाणात त्यात यशही आलं. साताऱा लोकसभेला उदयनराजेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्याचवेळी पवारांच्या सभानंतरही शशिकांत शिंदेंचा पराभव टळू शकला नाही. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे विजयी झाले.  

दरम्यान एका पराभवाने आपण थांबणार असून आणखी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. विधीमंडळात आपला आवाज नको होतो, म्हणून भाजपने माझ्या पराभवासाठी मोठी ताकद उभी केली होती, असंही शिंदे म्हणाले.

 

Web Title: Pawar's rally couldn't save defeat of Shahsikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.