सांगली : कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.ते म्हणाले की, देशात सर्वत्र सुरु असलेल्या खेळखंडोबाला केंद्र व राज्य सरकार दोन्हीही जबाबदार आहेत. कोरोना हा रोगच अस्तित्वात नाही. ज्याचे त्याचे आयुष्य प्रत्येकाच्या स्वाधिन आहे. लोक स्वत:च्या आरोग्याबाबत पाहून घेतील. सरकारने या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. हातावरची पोटं असलेली किती लोकं या लॉकडाऊनमध्ये मेली. किती लोक बेरोजगार झाले. त्याची फिकीर कोणाला नाही. रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांना लाठीने मारले जाते आणि दारुच्या दुकानात गर्दी करणाऱ्यांना सोडले जाते. सर्व व्यापार बंद ठेवून दारुची दुकाने सुरु ठेवता, हा काय प्रकार आहे.देशात सर्वत्र बावळट, नेभळट प्रजा असल्यामुळे कोरोनाचा आक्रोश सुरु आहे. लॉकडाऊनचीच गरज नाही. लोकांचे आरोग्य लोकांवर सोडून द्यावं, आणि सरकारने त्यांचा कारभार योग्य पद्धतीने करावा.दारु, मावा, मटका, चरस, गांजा सर्व मोकाट आणि एकत्र येऊन मुलांनी खेळायचे नाही, व्यायाम करायचा नाही हा महामुर्खपणा आहे. मास्क लावण्याने काहीही होत नाही. त्यामुळे मास्क वापरण्याची आवश्यकता नाही. लष्करी जवानांना मास्क घालून लढायला सांगायचे का. जिथे मरण्यासाठी लढायचे आहे, तिथे मास्कची गरज नाही, असे भिडे म्हणाले.नोटेवरचे गांधी आदर्श ठेवून कोरोना वाढेलशिवछत्रपती व संभाजी महाराजांना आदर्श ठेवून सरकारने कारभार करावा. नोटेवरचे गांधी आदर्श ठेवून हा कोरोना आणखी वाढेल, असेही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.
संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान ! कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 2:01 PM
CoronaVirus Sambhaji Bhide Sangli- कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देकोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत : संभाजीराव भिडेजगणारे जगतील, मरणारे मरतील, कोरोना हा मूळात रोगच नाही