पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:41 AM2019-05-20T00:41:47+5:302019-05-20T00:41:54+5:30

विक्रोळीतील वर्षानगरमधील नागरिक त्रस्त : १५ मिनिटांच्या पाण्यासाठी १०० रूपये

'Play the game for the night' | पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

पाण्यासाठी ‘रात्रीस खेळ चाले’

Next

मुंबई : अवघ्या १५ मिनिटाच्या पाण्यासाठी १०० रुपये मोजायचे. आणि पाण्याच्या प्रतीक्षेत रात्र काढायची. पाण्याने भरलेले हंडे, बादल्या कडेवर घेत निसरड्या वाटेतून घर गाठायचा. पाण्यासाठीचा असा जीवघेणा खेळ विक्रोळीच्या वर्षानगर परिसरात सुरु आहे.
विक्रोळी पश्चिमेकडील सुर्यानगर, शिवाजी नगर, रायगड झोन वर्षा नगर परिसरात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहेत. यात, डोंगरात वसलेल्या वर्षा नगर परिसरात ८ ते १० हजार रहिवासी पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. या परिसरात पाण्याची टाकी उभारली. मात्र याची देखरेख खासगी मंडळाकडून होते. त्यात येथील रहिवाशांनाकडून १५ मिनिटाच्या पाण्यासाठी महिनाकाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे.


सायंकाळी साडे सात वाजल्यापासून येथील विविध प्रभागांमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. त्यातही टेकडीवर असलेल्यांना पाण्यासाठी तळाशी असलेल्या नळावर रांगा लावाव्या लागतात. ३० मिनिटाची वेळ असली तरी, फक्त १५ ते २० मिनिटे पाणी रहिवाशांच्या नशीबी पडते. ते घेण्यासाठी सर्वांचीच धडपड असते. त्यामुळे अनेकदा ’कोणी पाणी देत का पाणी म्हणत’ ही मंडळी पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या नळाकडील रहिवांशाकडे विनवणी करताना दिसतात. एका नळावर अनेकदा १५ ते २० कुटुंब रांग लावून असतात.
अशात, अनधिकतपणे नळजोडणी वाढल्याने, येथील पाण्याचा दबाव आणखीन कमी झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्त्यावर पाणी सांडल्याने रस्ताही निसरडा होतो. त्यामुळे अपघाताच्याही छोट्या मोठ्या घटना येथील रहिवाशांसाठी नवीन नाही.

पाण्यासाठीच मरण...
पाण्यासाठीची वेळ ठरलेली. त्यातही कमी दाबामुळे एक हंडा भरण्यासाठी ४ ते ५ मिनिटे लागतात. त्यात, एका नळावर दोन कुटुंबे अवलंबून असली तरी, वरच्या रहिवाशांचीही त्याच ठिकाणी गर्दी असते. त्यामुळे आमच मरण हे नेहमीच बनले आहे. अशा अवस्थेत कोणीही मदतीला फिरकत नाही. नुकताच याच समस्येमुळे दुसरीकडे भाड्याने राहतो आहे.
- मनोज पांडे, स्थानिक रहिवासी

कमी वेळ, त्यात कमी दाब यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च कनेक्शन मिळते. कनेक्शन मिळाले की सुरुवातीचे १५ दिवस पाणी येणार व्यवस्थित, मात्र नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. त्यात, अनधिकत पाणी धारकांना ७० ते ७५ हजार रुपयांत जोडणी मिळते. जे अधिकत आहेत. त्यांच्याच नळाच्या पाईपमध्ये टब मारुन त्यांना पाणी दिले जाते.
- रवी तिवारी, शिवाजी नगर रहिवासी

मुंबईसारख्या ठिकाणी पाण्यासाठी अशी जीवघेणी अवस्था होते याच दुख आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
- सुनील विश्वकर्मा, वर्षानगर रहिवासी

आजही रात्रीच्या अंधारात मोबाईलच्या प्रकाशात पाण्याच्या बादल्या, हंड्या घेवून चढउतार करत आहोत. आधीच कमी वेळ त्यात, दबावही कमी झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- ज्ञानेश्वर अण्णा बोलकडे, वर्षानगर रहिवासी

Web Title: 'Play the game for the night'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.