PM Modi in Shirdi: 'घर की बात' करत साईंच्या शिर्डीत मोदींनी फोडला 'मिशन २०१९'चा नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 01:25 PM2018-10-19T13:25:11+5:302018-10-19T13:28:59+5:30
काँग्रेस सरकारवर टीका करत भाजपा सरकारच्या कामांची यादी मोदींकडून सादर
शिर्डी: आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं बांधली होती. त्याच कालावधीत आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली आहेत. नियत स्वच्छ असल्यावर काम जलद गतीनं होतात, अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन 2019चा नारळ फोडला. आधीचं सरकार सत्तेवर असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून 20 वर्षे लागली असती. योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त आणि फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली. शिर्डीत आलेल्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांची चावी देण्यात आली. यानंतर मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.
A permanent house makes life easy & provides enthusiasm to fight against poverty. Keeping this in mind, the govt has set the goal of providing a permanent house to every family by 2022. I am happy that we have completed half the journey: PM Narendra Modi in Shirdi, Maharashtra pic.twitter.com/ot4IgZbUgf
— ANI (@ANI) October 19, 2018
पंतप्रधानांनी राज्यातील 29 जिल्ह्यातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील घरकुलांचं ई-वितरण केलं. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी सरकारकडून 4 वर्षात करण्यात आलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या कामांची तुलनादेखील केली. 'आधीचं सरकार घरासाठी 70 हजार रुपये द्यायचं. आम्ही घरासाठी 1 लाख रुपये देतो. याशिवाय भाजपा सरकारनं दिलेल्या घरांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. आम्ही गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरं उभारली. मागील सरकारच्या कामाचा वेग पाहता इथंपर्यंत पोहोचायला त्यांना आणखी 20 वर्ष लागली असती,' अशी आकडेवारी सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
In its last 4 years of governance, the previous govt built only 25 Lakh houses. In last 4 years, the BJP-led central govt built 1.25 Crore houses: Prime Minister Narendra Modi in Shirdi, Maharashtra pic.twitter.com/sZMnIhvWVX
— ANI (@ANI) October 19, 2018
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
- राज्यात जलयुक्तमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त आणि 9 हजार दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर- मोदी
- दुष्काळ निवारण्याच्या कामात आम्ही राज्य सरकारसोबत- मोदी
- देशातील 50 कोटी लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळेल, महिनाभरात एक लाख रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार झाले- मोदी
- पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भगिनींशी संवाद साधून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला, यातून कामाची प्रेरणा मिळाली- मोदी
- 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर माणसाला घर देण्याचा प्रयत्न, त्यातील अर्धा टप्पा पूर्णत्वास- मोदी
- नवरात्र ते दिवाळी नवीन काही घेण्याचा, खरेदीचा मोसम याच मुहूर्तावर महाराष्ट्र मधील गरिबांना घरे देण्याची संधी मिळाली- मोदी
- गरीबाच्या कल्याणासाठी शिर्डी निवडल्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद
- बाबांच्या शिकवणुकीचं संस्थानाकडून अनुकरण- मोदी
- साईंची शिकवण समाजाला एकत्र बांधणारी- मोदी
- बाबांच्या स्मरणानं गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते- मोदी
- शिर्डीतील कणाकणात साईबाबा वास करतात- मोदी
- मोदींकडून भाषणाची सुरुवात मराठीतून
- तुमचं प्रेम हेच माझं सामर्थ्य, त्यातून ऊर्जा मिळते- मोदी