शिर्डी: आधीच्या सरकारनं 4 वर्षात 25 लाख घरं बांधली होती. त्याच कालावधीत आम्ही 1 कोटी 25 लाख घरं बांधली आहेत. नियत स्वच्छ असल्यावर काम जलद गतीनं होतात, अशा शब्दांमध्ये विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन 2019चा नारळ फोडला. आधीचं सरकार सत्तेवर असतं, तर तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून 20 वर्षे लागली असती. योजना आधीही होत्या, आताही आहेत. मात्र त्यावेळच्या योजनांची अंमलबजावणी फक्त आणि फक्त मतपेढी डोळ्यासमोर ठेवून केली जायची, अशी टीका मोदींनी केली. शिर्डीत आलेल्या मोदींच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरांची चावी देण्यात आली. यानंतर मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-- राज्यात जलयुक्तमुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त आणि 9 हजार दुष्काळमुक्त होण्याच्या मार्गावर- मोदी- दुष्काळ निवारण्याच्या कामात आम्ही राज्य सरकारसोबत- मोदी- देशातील 50 कोटी लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळेल, महिनाभरात एक लाख रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार झाले- मोदी- पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी भगिनींशी संवाद साधून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला, यातून कामाची प्रेरणा मिळाली- मोदी- 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघर माणसाला घर देण्याचा प्रयत्न, त्यातील अर्धा टप्पा पूर्णत्वास- मोदी- नवरात्र ते दिवाळी नवीन काही घेण्याचा, खरेदीचा मोसम याच मुहूर्तावर महाराष्ट्र मधील गरिबांना घरे देण्याची संधी मिळाली- मोदी- गरीबाच्या कल्याणासाठी शिर्डी निवडल्याबद्दल राज्य शासनाला धन्यवाद- बाबांच्या शिकवणुकीचं संस्थानाकडून अनुकरण- मोदी- साईंची शिकवण समाजाला एकत्र बांधणारी- मोदी- बाबांच्या स्मरणानं गरिबांची सेवा करण्याची प्रेरणा मिळते- मोदी- शिर्डीतील कणाकणात साईबाबा वास करतात- मोदी- मोदींकडून भाषणाची सुरुवात मराठीतून- तुमचं प्रेम हेच माझं सामर्थ्य, त्यातून ऊर्जा मिळते- मोदी