चंद्रपूरमध्ये पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आठ शेतक-यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 03:05 AM2017-10-09T03:05:16+5:302017-10-09T03:05:41+5:30
पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
भद्रावती (चंद्रपूर) : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
संजय मडावी (३५), विजय मत्ते (३२), रवींद्र भोगरे (४२), रमेश देठे, सतीश रा. कोंढा, किशोर काकडे (४०), अमोल नाकाडे, चंद्रभान डोळस (५०) अशी विषबाधा झालेल्या शेतकरी आणि मजुरांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत अजूनही तालुका कृषी विभाग अनभिज्ञ आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी तथा मजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथून मोठ्या प्रमाणात तालुक्यात कीटकनाशके आणली जात असल्याची माहिती आहे.
दोन कृषी केंद्रांवर गुन्हा
यवतमाळ : फवारणीच्या विषबाधेतून शेतकºयांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, पांढरकवडा आणि दिग्रस तालुक्यांतील कलगाव येथील कृषी साहित्य विक्रेत्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमालोद्दीन कियामोद्दीन शेख रा. कलगाव (ता. दिग्रस) आणि दीपक भास्करराव कापर्तीवार रा. पांढरकवडा अशी गुन्हे दाखल झालेल्या कृषी केंद्र चालकांची नावे आहेत.