सायबरविश्वावर पोलिसांची करडी नजर

By Admin | Published: July 28, 2015 02:57 AM2015-07-28T02:57:12+5:302015-07-28T02:57:12+5:30

याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद

Police look stoned on cyberbullying | सायबरविश्वावर पोलिसांची करडी नजर

सायबरविश्वावर पोलिसांची करडी नजर

googlenewsNext

- डिप्पी वांकाणी, मुंबई
याकूब मेमनची फाशी व पंजाबमध्ये झालेला दहशतवादी हल्ला या दोन घटनांमुळे महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले असून, ते गुंडांवर करडी नजर ठेवून आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व औरंगाबाद या शहरातील सुरक्षा कडक करण्यात आली असून महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल २४ तास काम करत आहे. फेसबुक व टिष्ट्वटरवरील आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकल्या जात आहेत. राज्यात अलर्ट लावण्यात आला नाही; पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून ते कोणतीही संधी जाऊ देण्यास तयार नाहीत.
संपूर्ण राज्यातील पोलीस ठाण्यांना रेल्वेस्थानके व मॉल्समधील सुरक्षा वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉल्समध्ये पोलिसांनी खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करावे, असे सांगण्यात आले आहे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. मॉल्समधील सुरक्षा रक्षकांनी सतर्क व्हावे, पार्र्किंग, येण्या जाण्याचे रस्ते यावर करडी नजर ठेवावी, असे कुमार यांनी म्हटले आहे.
वेबजगावर आमची बारीक नजर आहे, आमचे लोक आॅनलाईन वर्ल्डवर २४ तास नजर ठेवून आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुक व टिष्ट्वटरवरील अनेक आक्षेपार्ह टिष्ट्वट व पोस्ट काढून टाकण्यात आले आहेत. कोणतीही पोस्ट इतरांना दुखावण्यासारखी आहे असे वाटले तर लगेच ती डिलिट केली जाते, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Police look stoned on cyberbullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.