पानसोलीत रिंगरोडची पाहणी

By Admin | Published: May 21, 2016 01:41 AM2016-05-21T01:41:58+5:302016-05-21T01:41:58+5:30

‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पानसोली गावातील रिंगरोड बदलण्याचा घाट’ या वृत्ताची दखल घेत तहसीलदार व जलसंपदा विभागाकडून रिंगरोडची पाहणी करण्यात आली

Pongaloli ring road survey | पानसोलीत रिंगरोडची पाहणी

पानसोलीत रिंगरोडची पाहणी

googlenewsNext


वडगाव मावळ : ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘पानसोली गावातील रिंगरोड बदलण्याचा घाट’ या वृत्ताची दखल घेत तहसीलदार व जलसंपदा विभागाकडून रिंगरोडची पाहणी करण्यात आली.
पानसोली येथील पवना धरणग्रस्तांसाठी शासनाने सन १९७०ला मंजूर केलेला रिंगरोड बदलून दुसऱ्या बाजूने वळविण्याचा घाट धनदांडगांनी घातला आहे. जुना रस्ता कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार, वनविभाग व पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते.
शासनाने पवना धरणाच्या काठावर वसलेल्या गावांसाठी रिंगरोड तयार केला आहे. परिसरातील गावे या रिंगरोडने दळणवळण करत असतात. पण पानसोलीत एका उद्योजकाने रिंगरोड बदलण्याचा घाट घातला आहे. याबाबत ग्रामस्थ व पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने नवीन रस्ता बंद करून शासनाने खर्च केलेला रस्ता ग्रामस्थांना वापरण्यास द्यावा, या मागणीचे निवेदन संबंधित विभागाला दिले होते. तहसीलदार शरद पाटील, मंडलाधिकारी बाबूराव माने, शाखा अभियंता व्ही. एन. पागे, पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, उपाध्यक्ष दशरथ शिर्के, उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, वसंत तुपे, गोविंद घाडगे, विठ्ठल घाडगे यांच्यासह धरणग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांसह गावात पाहणी केली. (वार्ताहर)
>तहसीलदार पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी, संबंधित जागेचे मालक, धरणग्रस्त शेतकरी व केवरे, पानसोली, कोळे-चाफेसर येथील ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक जागामालक या वेळी उपस्थित होता. उर्वरित जागामालकांचे प्रतिनिधी या चर्चेसाठी उपस्थित होते.
तहसीलदार पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी, संबंधित जागेचे मालक, धरणग्रस्त शेतकरी व केवरे, पानसोली, कोळे-चाफेसर येथील ग्रामस्थ यांच्यासमवेत चर्चा केली. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक जागामालक या वेळी उपस्थित होता. उर्वरित जागामालकांचे प्रतिनिधी या चर्चेसाठी उपस्थित होते.
>कृती समितीचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर म्हणाले की, शासनाने रिंगरोडसाठी खर्च केला आहे. येथील जुना, बंद केलेला रस्ता लवकर दळणवळणासाठी खुला करावा. या परिसरातील ग्रामस्थांना हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेली लाँच सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून लवकर रस्ता सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात.

Web Title: Pongaloli ring road survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.