सोनोग्राफी यंत्र पुरविणारा मुंबईतील डीलर ताब्यात
By admin | Published: July 3, 2015 03:05 AM2015-07-03T03:05:31+5:302015-07-03T03:05:31+5:30
गर्भलिंग चाचणीप्रकरणी चायना बनावटीचे सोनोग्राफी यंत्र पुरविणाऱ्या मुंबईतील डीलरला गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित श्रीपाद मधुसूदन गाड
कोल्हापूर : गर्भलिंग चाचणीप्रकरणी चायना बनावटीचे सोनोग्राफी यंत्र पुरविणाऱ्या मुंबईतील डीलरला गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित श्रीपाद मधुसूदन गाड
(६३, रा. अंधेरी) असे त्याचे नाव
आहे. दिल्लीतून एका प्रदर्शनातून आपण चायना बनावटीचे सोनोग्राफी यंत्र खरेदी करून ते डॉ. विक्रम आडकेला विकल्याची कबुली त्याने दिली आहे.
गर्भलिंग चाचणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. विक्रम आडके याने सोनोग्राफी यंत्रे मुंबईतील डीलर श्रीपाद गाड याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने आडकेला सोबत घेऊन मुंबई गाठली.
संशयित गाड याच्या अंधेरी येथील मेडिकल शॉपवर छापा टाकला असता तो सापडला. या वेळी शॉपमध्ये आणखी काही यंत्रे आहेत का, याचा पोलिसांनी शोध घेतला; परंतु हाती काही लागले नाही. (प्रतिनिधी)