मुंबई: मुंबईकरांची खड्ड्यातून सुटका करण्याचा दावा करणारे तंत्रज्ञान, मुंबईच्या रस्त्यांवर वापर होण्याआधीच खड्ड्यात गेले आहे. नागपूरस्थित या कंपनीने खड्डे दुरुस्तीची जबाबदारी उचलली होती. मात्र, ऐनवेळी या कंपनीने आता माघार घेतली आहे. त्यामुळे पालिका तोंडघशी पडली आहे. दरवर्षी मुंबईचे रस्ते खड्ड्यात गेले की, मुसळधार पावसाला दोष देण्यात येत होता. या वर्षी रस्ते घोटाळा उघड झाल्याने, पालिकेचे पितळ उघडे पडले आहे. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असून, उच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिका प्रशासनाने नागपूरस्थित कंपनीला संधी देऊन, मुंबईला खड्डेमुक्त करण्याची तयारी केली होती. टेक्नॉलॉजीच्या भरवशावर दोन आठवड्यांत मुंबईतील खड्डे बुजतील, असा दावा पालिकेने केला आहे. तयार मिश्रण सामान्य तापमानातही खड्ड्यांमध्ये ओतल्यास २० मिनिटांत खड्डे भरतात आणि वाहतुकीला हा मार्ग खुला होऊ शकतो, असा दावा नागपूरच्या कंपनीने केला होता. मात्र, पालिकेने त्यांना संधी देताना आधी प्रयोग करून दाखवा. मग कंत्राट देऊन अशी भूमिका घेतल्याने या कंपनीने स्पर्धेत येण्यापूर्वीच माघार घेतल्याचे समजते. >कंपनीचा नकारपालिका आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, संबंधित कंपनीने खड्डे भरून दाखवण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवल्यास रस्ते विभागाने कळवावे. मात्र, ५० हजार रुपयांचे काम करण्यास या कंपनीने नकार देत, किमान ३ लाखांचे काम सांगा, अशी अट घातली आहे.>आणखी तीन प्रयोग : भरवशाच्या कंपनीने अशी माघार घेतल्यामुळे, तोंडघशी पडलेल्या पालिकेने अन्य तीन कंपन्यांना संधी द्यायचे असे ठरवले आहे. इको ग्रीन, शालिमार आणि एआर थर्माे या तीन कंपन्यांना शहर अथवा उपनगरात खड्डे भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, याचा प्रभाव कळण्यास एक आठवडा लागेल. >दोन हजार खड्डे?पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आत्तापर्यंत दोन हजार खड्डे पडले आहेत. प्रत्यक्षात मात्र ही संख्या कैकपटीने अधिक आहे.
खड्ड्यांचे तंत्रज्ञानही गेले खड्ड्यात
By admin | Published: August 02, 2016 2:11 AM