हॅकर म्हणजे चोर, त्याच्यावर का विश्वास ठेवायचा?: प्रकाश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:15 AM2019-01-22T11:15:47+5:302019-01-22T13:52:39+5:30
इव्हीएम नव्हते तेव्हाही मुंडे मताधिक्याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवण्याचे आव्हानही द्यायचे.
मुंबई : गोपीनाथ मुंडे यांचा हॅकिंगसारख्या बाष्कळ गोष्टींवर विश्वास नव्हता; इव्हीएम नव्हते तेव्हाही मुंडे मताधिक्याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवा असेही सांगायचे, त्यांचा तेवढा अभ्यास होता, असे गोपीनाथ मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन यांनी सांगत अमेरिकन हॅकरचा दावा खोडून काढला.
याचबरोबर त्यांनी हॅकरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गेली साडेतीन 4 वर्षे हा हॅकर कुठे होता. आताच का तो बोलला. हॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा. निवडणूक आल्यावर गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
1985 मध्ये मुंडे इव्हीएम नव्हते तेव्हा प्रत्येक मतदारसंघात किती मते पडतील याचा आकडा सांगायचे आणि लिहून ठेवा, असे आव्हानही द्यायचे. त्यांचा प्रत्येक मतदारसंघाचा मतदारांच्या कौलाचा अभ्यास होता. यामुळे ते इव्हीएमच्या हॅकिंगवर विश्वास ठेवतील असे वाटत नाही, असे सांगत हॅकरचा दावा हेतूपुरस्सर असल्याचे सांगितले.