राष्ट्रीय कृषी बाजाराला जोडण्यासाठी ६२ बाजार समित्यांचा केंद्राकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 03:08 PM2019-11-28T15:08:56+5:302019-11-28T15:11:13+5:30
देशभरातील मार्केटमध्ये आॅनलाईन खरेदीविक्री करण्यासाठी ई-नाम; महाराष्टÑातील ६३ बाजार समित्यांचा समावेश
अरुण बारसकर
सोलापूर: कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील जुन्या पद्धतीचे कामकाज आता कालबाह्य झाले असून, केंद्र सरकारने आता देशभरातील मार्केटमध्ये आॅनलाईन खरेदीविक्री करण्यासाठी ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) प्रणाली विकसित केली आहे. १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ५८५ बाजार समित्या या प्रणालीला जोडल्या असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६३ बाजार समित्यांचा समावेश आहे. शिवाय राज्यातील आणखी ६२ बाजार समित्यांचा यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.
महाराष्ट्रात पणन मंडळ ाच्या अखत्यारित ३०७ बाजार समित्या कार्यरत आहेत. शेतकºयांचा शेतीमाल देशभरात कोणालाही खरेदी करता यावा व यातून शेतकºयांना चांगला दर मिळावा या उद्देशाने ई-नाम प्रणाली अवलंबली जाते. आतापर्यंत दोन टप्प्यात ६० बाजार समित्या या प्रणालीशी जोडलेल्या आहेत. याशिवाय विशेष बाब म्हणून ‘आकांक्षी’ प्रकल्पातून मागास जिल्'ातील तीन बाजार समित्यांचाही यामध्ये समावेश केला आहे. या प्रक्रियेला जोडलेल्या राज्यातील ६३ बाजार समित्यांमध्ये आॅनलाईन ई ट्रेडिंग सुरू झाले आहे. असे असतानाच नव्याने ६२ बाजार समित्यांचा प्रस्ताव राज्य पणन मंडळाने केंद्राला सादर केला आहे. ई-नाम प्रणालीनुसार बाजार समित्यांचे कामकाज केल्यास पारदर्शकता येणार असल्याचे सांगितले जाते.
ई-नामची सद्यस्थिती
- - ६० बाजार समित्यांमध्ये ई-आॅक्शन(ई-लिलाव) द्वारे ७७.०९ लाख क्विंटल शेतीमालाची विक्री, शेतीमालाच्या विक्रीतून २११६ कोटी रुपयांची उलाढाल झाली. - ६० बाजार समित्यांमध्ये शेतीमाल गुणवत्ता तपासणी लॅब कार्यरत असून, त्यापैकी ५७ बाजार समित्यांमध्ये ३.२४ लाख लॉटची तपासणी झाली.
- - ३३ बाजार समित्यांनी शेतीमालाचे ई-पेमेंट केले असून, ई-पेमेंटद्वारे ५६.३७ कोटी रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले.
- - ११.८४ लाख शेतकºयांची ई-नाम प्रणालीमध्ये नोंदणी झाली.
- - १६४४४ व्यापारी तर १३ हजार ३९९ अडत्यांनी ई-नाम प्रणालीनुसार शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी नोंदणी केली.
- - शेती उत्पादक २०५ कंपन्यांनी ई-नामसाठी नोंदणी केली.
सोलापूरच्या ६ बाजार समित्या
च्जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात बार्शी व दुसºया टप्प्यात सोलापूर बाजार समितीचा समावेश झाला आहे. नव्याने दुधनी, पंढरपूर, सांगोला, करमाळा, मंगळवेढा अकलूज या सहा बाजार समित्यांचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. केंद्राने मंजुरी दिल्यास जिल्ह्यातील ८ बाजार समित्यांचे कामकाज ई-नाम प्रणालीनुसार चालणार आहे.
ई-नाम प्रणालीमुळे शेतीमालाची शेतकºयांकडून होणारी पैशाची कपात कमी होईल. शेतकºयांना तत्काळ पैसे मिळतील. स्पर्धा वाढल्याने दर चांगले मिळतील. संचालक मंडळाने चांगल्या पद्धतीने ही प्रणाली राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यात शेतकरी, अडते, व्यापारी व बाजार समित्यांचे हित आहे.
- सुनील पवार, कार्यकारी संचालक, राज्य पणन मंडळ