घोटाळ्याचे पुणे हेच मुख्य केंद्र

By admin | Published: July 3, 2015 03:08 AM2015-07-03T03:08:40+5:302015-07-03T03:08:40+5:30

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) तिकीट घोटाळ्याचे जिल्हानिहाय विभाजन केले असता चंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील सर्वाधिक तिकिटे गायब झाली असून, पुणे हेच

Pune is the main center of the scam | घोटाळ्याचे पुणे हेच मुख्य केंद्र

घोटाळ्याचे पुणे हेच मुख्य केंद्र

Next

डिप्पी वांकाणी, मुंबई

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) तिकीट घोटाळ्याचे जिल्हानिहाय विभाजन केले असता चंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील सर्वाधिक तिकिटे गायब झाली असून, पुणे हेच या घोटाळ्याचे मुख्य केंद्र असल्याचे उघडकीस आले आहे. ‘लोकमत’नेच हा घोटाळा उघडकीस आणला असून, त्याचे विश्लेषणही प्रथम लोकमतनेच केले आहे. पुणे केंद्रात २८ लाख तिकिटे बेपत्ता आहेत किंवा विभागीय कार्यालयानी तिकिटे जारी केल्यानंतरही त्यांची नोंद झालेली नाही. सर्वांत कमी घोटाळे वर्धा जिल्ह्यात झाले असून, तेथील गायब तिकिटांची किंमत फक्त १५१ रुपये आहे. राज्यातील २८ विभागांत मुंबईचा क्रमांक पाचवा असून, मुंबईत ३ लाख ८० हजार रुपये किमतीची तिकिटे गायब झाली आहेत. परिवहन महामंडळाच्या अंमलबजावणी खात्याने संपूर्ण राज्यात हाताने दिल्या जाणाऱ्या तिकीट सेवेचा आढावा घेतला. त्यात ८४,३५,४३८ रु. किमतीची तिकिटे गायब आहेत असे स्पष्ट झाले. विभागीय कार्यालयाकडून २८०२८९१ रु. किमतीची तिकिटे जारी करण्यात आली; पण त्यांची नोंद ठेवण्यात आली नाही. एकूण ८४,३५,४३८ रु. किमतीच्या तिकिटांपैकी २७,५१,८०४ रु. किमतीची तिकिटे चंद्रपूर - गडचिरोली येथून गायब झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ पुण्याचा नंबर असून, पुण्यात १६,४७,४३२ रुपयांची तिकिटे गायब आहेत. तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक अनुक्रमे बुलडाणा, लातूर व अहमदनगर यांचा आहे. अंमलबजावणी खात्याने जमा केलेल्या माहितीनुसार, विभागीय कार्यालयांनी पुण्यात जारी केलेल्या ११,५५,८९१ रु. किमतीच्या तिकिटांची नोंद केली गेली नाही. उस्मानाबाद व लातूर विभागात ६,१०,६०० रु. व ४,७३,६०० रु. किमतीच्या तिकिटांची नोंद झाली नाही. आम्ही ही बाब उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या निदर्शनास आणली आहे. विभागीय कंट्रोलरनी आपले काम नियमानुसार केले आहे. १९७१च्या नियमानुसार रात्री डेपोतच थांबले पाहिजे असे आदेश आहेत. पण त्याचे पालन केले जात नाही. रात्री डेपोतच थांबण्याचा नियम पाळल्यास तिकिटे गायब होण्यासह अनेक गैरप्रकारावर आमची नजर राहील, असे अंमलबजावणी अधिकाऱ्याने सांगितले. तिकिटे गायब होण्यासंदर्भात कंडक्टर अत्यंत जुजबी न पटणारी उत्तरे देतात. तिकिटे हरवली असे सांगितले जाते.

ठिकाणबेपत्ता तिकिटे तिकिटे जारी (रुपयांत)पण नोंद नाही  मुंबई३,८००००० ठाणे२११० पालघर ७००० सिंधुदुर्ग ६६२५४०,१७० रायगड १३,५९२० पुणे १६,४७,४३२११,५५,८९१ सांगली ४५,९०५ ० सातारा ४२,७००१०,००० सोलापूर ८२८०१०० कोल्हापूर २१०००० नाशिक ९१८८० अहमदनगर५१,१०००२०० धुळे ९८,२७८० जळगाव १५,८३००० औरंगाबाद ३२,९६०० परभणी १,६०,९००१७,१००० लातूर ५,२८,७००४७,३६०० जालना १३९९० नांदेड १३००१०,००० उस्मानाबाद २,७३,४००६,१०,६०० बीड ३,४७,७९७६८,१३० अमरावती ४२,७००२००० यवतमाळ ५१५०४०० अकोला २,६९,१२११०० बुलढाणा १३१४३००० नागपूर४७५४० वर्धा १५१० चंद्रपूर २७,५१,८०४०

Web Title: Pune is the main center of the scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.